दिवाळी संपताच दापोलीत राष्ट्रवादीला धक्का; तालुक्यात राजकीय खळबळ


हायलाइट्स:

  • उपसभापती ममता शिंदे यांचा राजीनामा
  • तालुक्यात राजकीय खळबळ
  • राष्ट्रवादीमधील नेत्याबरोबर झालेल्या वादामुळे राजीनामा?

रत्नागिरी :दापोली पंचायत समितीच्या उपसभापती ममता शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या असलेल्या ममता शिंदे यांच्या राजीनाम्याने तालुक्यात मोठी राजकीय खळबळ उडाली आहे.

ममता शिंदे यांनी पंचायत समिती सदस्यत्वासह उपसभापतीपदाचा राजीनामा सभापती योगिता बांद्रे यांच्याकडे बुधवारी दुपारी सुपूर्द केला आहे. हा राजीनामा सभापतींनी मंजूर केल्यावर प्रशासनाकडे पाठवला जाईल आणि त्यावर शिक्कामोर्तब होईल. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत मंजुरीसाठी प्रशासनाकडे हा राजीनामा आलेला नाही.

Sangli Crime: सांगलीतील धक्कादायक प्रकार उघड; इन्स्टाग्रामवर तिच्याशी मैत्री झाली आणि…

ममता शिंदे यांचा राजीनामा हा दापोली तालुक्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का असल्याचं मानला जात आहे. हा राजीनामा केवळ घरगुती कारणास्तव दिल्याचं त्यांनी सांगितलं आहे. मात्र राष्ट्रवादीमधील एका नेत्याबरोबर झालेल्या वादामुळे त्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर दापोली विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा भविष्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी या महाविकास आघाडीतील घटकपक्षांत रस्सीखेच सुरू असल्याचं चित्र आहे. त्यातच राष्ट्रवादीच्या आणखी एका पदाधिकाऱ्याने राजीनामा दिल्याने दापोलीतील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघालं आहे. उपसभापतीपदाचा राजीनामा देणाऱ्या ममता शिंदे या आगामी काळात नेमका काय राजकीय निर्णय घेतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: