jee mains scam : जेईई मेन परीक्षेत घोटाळा; सीबीआयचे पुणे, दिल्ली, बेंगळुरूसह १९ ठिकाणी छापे


नवी दिल्लीः जेईई मेन परीक्षेत घोटाळा करणाऱ्या एका टोळीचा सीबीआयने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी एफआयआर दाखल करत सीबीआयने दिल्ली, एनसीआर, पुणे, बेंगळुरू, जमशेदपूर आणि इंदूरसह एकूण १९ ठिकाणी छापे टाकले. NIT सारख्या प्रमुख संस्थांमध्ये नाव नोंदवण्यासाठी ही टोळी १२ ते १५ लाख रुपये घेत होती. सीबीआयने या प्रकरणी १ सप्टेंबरला एफआयआर दाखल केली होती. पण छापे मारण्यासाठी जेईई मेनच्या चौथ्या टप्प्यातील परीक्षा संपण्यासाठी सीबीआय थांबली.

नोएडातील एफिनिटी एज्युकेशनचे संचालक होते टोळी प्रमुख

नोएडातील एफिनिटी एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेड संस्थेच्या संचालकांनी जेईई मेन परीक्षेत रँकिंग मिळवून देण्यासाठी संपूर्ण यंत्रणा तयार केली होती. त्यांचे एजंट अनेक राज्यांत विखुरलेले होते. हे एजंट जेईई मेन परीक्षेत कमी रँकिंग असलेल्या विद्यार्थ्यांना गाठून त्यांना चांगली रँकिंग आणि एनआयटी सारख्या प्रमुख संस्थेत नाव नोंदणीचं आश्वासन देत होते. याबदल्यात ते १२ ते १५ लाख रुपये मागत होते. परीक्षेत घोटाळा करण्यासाठी एफिनिटी एज्युकेशनच्या संचालकांनी हरयाणातील सोनीपतमधील एका परीक्षा केंद्रातील काही कर्मचाऱ्यांना साटंलोटं केलं होतं. विद्यार्थ्यांना हे परीक्षा केंद्र निवडण्यास सांगितलं जात होतं, अशी माहिती सीबीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

परीक्षा केंद्रात कर्मचाऱ्यांच्या मदतीने सुरू होता गैरकारभार

महाराष्ट्र आणि कर्नाटकसह इतर राज्यांमधील अनेक विद्यार्थी जेईई मेनसाठी सोनीपतचे परीक्षा केंद्र निवडत होते. परीक्षा केंद्रातील सामील असलेल्या अधिकाऱ्यांच्या मदतीने संबंधित विद्यार्थ्याच्या कंप्युटरचा रिमोट कंट्रोल घेऊन ते दूर कुठेतरी बसलेल्या एका व्यक्तीला द्यायचे. आणि ती व्यक्ती त्या विद्यार्थ्याच्या सर्व प्रश्नांची उत्तर देत होता.

india taliban news : भारताचा तालिबानला स्पष्ट संदेश! परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते म्हणाले…

चांगल्या रँकिंगसाठी घेत होते १२ ते १५ लाख

रँकिंग मिळवून देण्यासाठी एफिनिटी एज्युकेशनचे संचालक विद्यार्थ्यांकडून १२ ते १५ लाखांचा पोस्ट डेटेड चेक घेत होते. तसंच जेईई मेन मध्ये चांगली रँकिंग मिळवून दिल्यावरच चेक वटवला जाईल, याची गँरंटी ते विद्यार्थ्यांना देत होते. सीबीआयच्या छाप्यात ३० पोस्ट डेटेल चेक मिळाले आहेत. याशिवाय विद्यार्थ्यांची १० वी आणि १२ वीची मूळ प्रमाणपत्रं, जेईई मेनचा युजर आयडी आणि पासवर्ड आपल्याकडे ते आपल्या ठेवून घेत होते. पूर्ण पैसे मिळाल्यावरच ती परत केली जात होती.

… म्हणून त्याने पत्नी, २ मुलांची हत्या करून मृतदेह घरात पुरले; नंतर मित्रालाही मारलं

छापेमारीसाठी सीबीआयने परीक्षा संपण्याची वाट बघत होती

शिक्षण मंत्रालयाने एका वर्षात विद्यार्थ्यांना ४ वेळा जेईई मेन परीक्षा देण्याची संधी दिली होती. विद्यार्त्यांनी आपली रँकिंग सुधारावी, हा यामागचा उद्देश होता. या आठवड्यात चौथ्या संधीची परीक्षा सुरू होती. गुरुवारी परीक्षेचा शेवटचा दिवस होता. गेल्या तीन परीक्षांमध्ये कमी रँकिंग असलेल्या विद्यार्थ्यांना हेरलं जात होतं. सीबीआयला या घोटाळ्याची माहिती आधीच मिळाली होती. सीबीआयने पूर्ण तपासानंतर बुधवारीच एफआयआर दाखल केली होती. पण छापे टाकण्यासाठी परीक्षा संपण्याची वाट बघितली गेली. कारण पैसे घेण्यात आलेल्या विद्यार्थ्यांसह इतरही विद्यार्थी परीक्षा देत होते. यामुळे त्यांच्या परीक्षेत अडचण आली होती, असं एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं. सीबीआयने छाप्यांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रांसह सात पीसी आणि २५ लॅपटॉप जप्त केले आहेत. याशिवाय मोठ्या प्रमाणावर घोटाळ्याशीसंबंधित कागदपत्रे हातील आल्याचा दावाही सीबीआयने केला आहे.

सीबीआयने एफिनिटी एज्युकेशसह संस्थेचे संचालक सिद्धार्थ कृष्णा, विशंभरमणी त्रिपाठी आणि गोविंद वार्षेय यांनाही या प्रकरणी आरोपी केलं आहे. आरोपींमध्ये पानीपत परीक्षा केंद्रातील काही कर्मचारी आणि देशातील विविध भागांमधील दलाल आणि रिमोटवर परीक्षा देणाऱ्यांच्या नावाचाही समावेश आहे. तसंच तपासात आणखी आरोपींचा समावेशही होऊ शकतो, असं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: