हा प्रकार घडल्यानंतर अॅडलेड स्ट्रायकर्सची पेन्ना मैदानातच काही मिनिटे बेशुद्ध अवस्थेत पडली होती. वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी मैदानात धाव घेत तिची तपासणी केली. समालोचक अॅडम पिकॉक म्हणाले की, ‘पेन्नाला खूप जोरात चेंडू लागला आहे. तिला खूप वेदना होत असल्याचे दिसून येते. हे खूप दुःखद आहे.’
वाचा- टी-२०चे कर्णधारपद सोडल्यानंतर विराटचा बसला मोठा फटका
वाचा- पुढच्या टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताचे काही खर नाही, BCCIने केली पराभवाची तयारी
मिशेल गोज्को म्हणाले की, ‘हे पाहणे खूप वेदनादायक आहे. मला त्या जखमेची जाणीव होत आहे. मलादेखील अनेकदा चेहऱ्यावर चेंडू लागला आहे. पेन्ना लवकर ठीक व्हावी, अशी आशा करतो.’ काही वेळानंतर पेन्नाला पुढील उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले.
वाचा- शास्त्री गुरुजींना निरोप देताना कोहली झाला भावूक; काय म्हणाला पाहा
स्ट्रायकर्सने थंडरला हरवले
या सामन्यात अॅडलेड स्ट्रायकर्सने सिडनी थंडरचा १८ धावांनी पराभव केला. स्ट्रायकर्सने या मोसमातील त्यांची १७६/४ सर्वोच्च धावसंख्या उभारली. दक्षिण आफ्रिकेची स्टार डॅन व्हॅन निकर्क आणि लॉरा वॉलवर्डने चांगली फलंदाजी केली. सलामीवीर निकर्कने ५८, तर वॉलवर्डने ३२ चेंडूत ५४ धावा केल्या.
वाचा- Video: तुम्ही देखील बघा, अशी आपली धुलाई केली होती
विल्सन (४२) आणि फोबी लिचफिल्ड (४०) यांच्या दमदार खेळीनंतरही थंडरचा संघ लक्ष्याचा पाठलाग करताना मागे राहिला. थंडरसाठी उदयोन्मुख इंग्लिश खेळाडू इसी वोंगने शानदार खेळी केली, पण संघाला विजयापर्यंत नेऊ शकली नाही. १९ वर्षीय वोंगने १७ चेंडूत ६ षटकारांच्या मदतीने ४३ धावा केल्या. वोंगने गोलंदाजीतही चांगली कामगिरी करताना दोन षटके मेडन टाकली होती.