ENG vs IND : चौथ्या कसोटीतही भारताचे पहिल्या डावात वस्त्रहरण, फलंदाजांची पुन्हा हाराकिरी…


लंडन : तिसऱ्या कसोटीनंतर चौथ्या सामन्याच्या पहिल्या डावातही भारतीय संघाचे वस्त्रहरण झाल्याचे पाहायला मिळाले. चौथ्या सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारताच्या फलंदाजांनी पुन्हा एकगा हाराकिरी केली आणि संपूर्ण संघ पहिल्याच दिवशी बाद झाला.

इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथण फलंदाजी करण्यासाठी पाचारण केले. रोहित शर्माच्या रुपात भारताला यावेळी पहिला धक्का बसला, त्याला ११ धावांवरच समाधान मानावे लागले. त्यावेळी भारताची १ बाद २८ अशी धावसंख्या झाली होती. पण याच धावसंख्येवर भारताला दुसरा धक्काही बसला. कारण सलामीवीर लोकेश राहुलही याच धावसंख्येवर बाद झाला, राहुलला यावेळी १७ धावा करता आल्या. चेतेश्वर पुजारा आणि रवींद्र जडेजा यावेळी पुन्हा एकदा धावा करण्यात अपयशी ठरले. एकिकडे भारताच्या विकेट्स पडत असल्या तरी कर्णधार विराट कोहलीने यावेळी अर्धशतक झळकावले. कोहलीला २२ धावांवर असताना जीवदान मिळाले होते. या जीवदानाचा फायदा घेत कोहलीने अर्धशतक झळकावले. पण अर्धशतक झळकावल्यावर कोहलीला एकही धाव करता आली नाही आणि तो ५० धावांवर बाद झाला.

भारतीय संघ यावेळी अडचणीत सापडला होता. त्यावेळी अजिंक्य रहाणे आणि रिषभ पंतकडून भारताला मोठ्या अपेक्षा होत्या. पण हे दोघेही यावेळी झटपट बाद झाले आणि भारताचे फलंदाज पुन्हा एकदा मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरल्याचे दिसत होते. पण यावेळी शार्दुल ठाकूर संघासाठी धावून आला. शार्दुलने यावेळी ३६ चेंडूंत सात चौकार आणि तीन षटकाराच्या जोरावर ५७ धावा केल्या आणि त्यामुळेच भारताला दीडशे धावांचा पल्ला ओलांडता आला. पण भारतीय संघाला यावेळी २०० धावांचा टप्पा मात्र गाठता आला नाही. कारण भारताचा पहिला डाव १९१ धावांवर संपुष्टात आला.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: