संघात स्थान दिले नाही म्हणून निवड समितीला घेतले अंगावर; भारतीय क्रिकेटपटूने शेअर केला फोटो


मुंबई: न्यूझीलंडचा क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. दोन्ही संघात १७ नोव्हेंबरपासून ३ सामन्यांची टी-२० मालिका होणार आहे. काल मंगळवारी निवड समितीने १६ जणांचा संघ जाहीर केला. विराट कोहलीने टी-२० संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर रोहित शर्माकडे नेतृत्व देण्यात आले. आयपीएलच्या १४व्या हंगामात चांगली कामगिरी करणाऱ्या अनेक खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. पण एका खेळाडूची कामगिरी चांगली होऊन देखील त्याला टीममध्ये घेतले गेले नाही.

वाचा- टी-२०चे कर्णधारपद सोडल्यानंतर विराटचा बसला मोठा फटका

आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व करणारा विकेटकीपर आणि फलंदाज संजू सॅमसन याला पुन्हा एकदा भारतीय संघात स्थान मिळाले नाही. निवड समितीने आपल्या कामगिरीची दखल न घेतल्याबद्दल नाराज झालेल्या संजूने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करून स्वत:चा राग व्यक्त केला. संजूने शेअर केलेल्या कोलाज फोटोत तीन फोटो आहेत. त्यात तो फिल्डिंग करताना दिसतोय. हा फोटो शेअर करताना त्याने काही म्हटले नाही. पण त्याचा इशारा निवड समितीकडे आहे.

वाचा-‘संघात दोन ग्रुप; एक दिल्ली तर दुसरा मुंबई, विराट कोहली टी-२०तून निवृत्ती घेणार’

वाचा- पुढच्या टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताचे काही खर नाही, BCCIने केली पराभवाची तयारी

काल भारतीय संघाची निवड झाल्यानंतर जेव्हा संजूचे नाव त्यात दिसले नाही तेव्हा चाहत्यांनी देखील नाराजी व्यक्त केली होती. सोशल मीडियावर #JusticeForSanjuSamson हा हॅशटॅग ट्रेंडमध्ये होता. संजूने शेअर केलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वाचा- Video: तुम्ही देखील बघा, अशी आपली धुलाई केली होती

आयपीएल २०२१च्या दुसऱ्या सत्रात संजूने धमाकेदार कामगिरी केली होती. त्याने संपूर्ण हंगामात १४ सामन्यात ४८४ धावा केल्या होत्या. संजूने २०१५ साली टीम इंडियाकडून पदार्पण केले होते. पण त्याने आतापर्यंत फक्त १० टी-२० सामने खेळले आहेत.

वाचा- अफलातून कामगिरी; दोन्ही हातांनी गोलंदाजी आणि…

वर्ल्डकपनंतर टी-२० संघाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा करणाऱ्या विराट कोहलीला न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. त्याच बरोबर जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा आणि मोहम्मद सिराज यांना देखील विश्रांती दिली आहे. टी-२० मालिकेनंतर न्यूझीलंडविरुद्ध २ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पहिल्या कसोटीत देखील विराटला विश्रांती दिली जाणार असून त्याच्या जागी रोहित शर्मा नेतृत्व करू शकतो.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: