धक्कादायक! आई तुळजाभवानीच्या नावे बोगस वेबसाईट, लाखो रुपयांची केली लूट


हायलाइट्स:

  • कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या नावाने बोगस वेबसाईट.
  • बोगस वेबसाईटच्या माध्यमातून लाखो रुपयाची केली लूट.
  • या प्रकरणी तुळजापूर पोलिसांनी तुळजापूर येथील केदार दीपक लसणे याला अटक.

तुळजापूर: कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या नावाने बोगस वेबसाईट काढून लाखो रुपयाची लूट केल्या प्रकरणी तुळजापूर पोलिसांनी तुळजापूर येथील केदार दीपक लसणे याला अटक केली. पोलिसांनी या आरोपीला कोर्टात हजर केले असता त्याला १३ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. (millions of rupees were looted by creating a bogus website in the name of goddess tulja bhavani)

केदार दीपक लसणेसह इतर ४ आरोपीच्या विरुध्द कारवाई करण्याचे आदेश उस्मानाबाद जिल्हाधिकारी तथा तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिले होते. या आदेशानुसार मंदिर संस्थानचे सहाय्यक व्यवस्थापक अनिल चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून तुळजापुर पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला होता.

क्लिक करा आणि वाचा- करोना: राज्यात आज करोनाचे नवे रुग्ण किंचित वाढले, मृत्युसंख्येत मात्र घट

या प्रकरणात मोठे नेते व बडे अधिकारी तसेच बोगस वेबसाईट चालू होणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात उस्मानाबाद येथील सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी कारवाईची मागणी केली होती. तुळजा भवानीच्या नावाने ऑनलाईन पैसे मागवून पूजाअर्चा कुलाचार करण्यासाठी लाखो रुपयाचे रॅकेट सुरू होते.

क्लिक करा आणि वाचा- किरीट सोमय्या यांना कोर्टाचे समन्स, काँग्रेसने ठोकला मानहानीचा दावा
क्लिक करा आणि वाचा- हाजी अराफत शेख मलिकांवर संतापले; म्हणाले, ‘उद्या जगाला सर्व सांगणार’Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: