सांगलीत आणखी १०२ एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई; कर्मचारी आंदोलनावर ठाम


हायलाइट्स:

  • सांगली जिल्ह्यात बुधवारी १०२ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई.
  • यापूर्वी मंगळवारी ५८ कर्मचाऱ्यांचे झाले होते निलंबन.
  • त्यामुळे गेल्या दोन दिवसात १६० कर्मचारी निलंबित झाले आहेत.

म. टा. प्रतिनिधी, सांगली

एसटी कर्मचारी आंदोलनावर ठाम असल्याने एसटी महामंडळाकडून कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई सुरू आहे. सांगली जिल्ह्यात बुधवारी १०२ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. यापूर्वी मंगळवारी ५८ कर्मचाऱ्यांचे निलंबन केले होते, त्यामुळे गेल्या दोन दिवसात १६० कर्मचारी निलंबित झाले आहेत. दरम्यान, एसटी महामंडळाकडून आंदोलक कर्मचा-यांवर निलंबनाच्या कारवाया होत असल्या तरीही, कर्मचारी आंदोलनावर ठाम असल्याने एसटीचा पेच वाढत चालला आहे. (msrtc workers strike another 102 st employees have been suspended in sangli)

एसटी कर्मचाऱ्यांचे सरकारमध्ये विलीनीकरण करावे, या मागणीवर एसटी कर्मचारी ठाम आहेत. कोर्टाचे आदेश आणि राज्य सरकारने विनंत्या केल्या नंतरही एसटी कर्मचारी कामावर हजर झाले नाहीत. उलट संप आणखी तीव्र करून एसटीची वाहतूक ठप्प केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा कामावर रुजू व्हावे, अन्यथा त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाईल, असा इशारा परिवहन मंत्र्यांनी दिला होता. त्यानुसार मंगळवारपासून आंदोलक कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई सुरू झाली आहे.

क्लिक करा आणि वाचा- साखर कारखान्यांना येणार ‘अच्छे दिन’; इथेनॉलच्या दरात वाढ

मंगळवारी सांगली जिल्ह्यातील ५८ एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली होती, तर बुधवारी आणखी १०२ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली. त्यामुळे गेल्या दोन दिवसात सांगली जिल्ह्यातील १६० एसटी कर्मचारी निलंबित झाले आहेत.

क्लिक करा आणि वाचा- करोना: राज्यात आज करोनाचे नवे रुग्ण किंचित वाढले, मृत्युसंख्येत मात्र घट

बुधवारी निलंबन केलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये आटपाडी आगारातील ५१ इस्लामपूर आगारातील ३१, तर तासगाव, विटा आणि शिराळा आगारातील प्रत्येकी ५ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली. एसटी महामंडळाकडून राज्यभरात कर्मचाऱ्यांवर निलंबनाच्या कारवाया वाढल्या असल्या तरीही, कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत. मागण्या मान्य झाल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा कर्मचा-यांनी घेतल्याने एसटीच्या आंदोलनाचा पेच वाढला आहे.

क्लिक करा आणि वाचा- किरीट सोमय्या यांना कोर्टाचे समन्स, काँग्रेसने ठोकला मानहानीचा दावाSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *