हायलाइट्स:
- गेल्या २४ तासांत राज्यात १ हजार ०९४ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे.
- गेल्या २४ तासांमध्ये एकूण १ हजार ९७६ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
- आज राज्यात एकूण १७ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आज राज्यात झालेल्या १७ रुग्णांच्या मृत्यूंनंतर राज्याच्या मृत्यूदर २.१२ टक्क्यांवरच स्थिर आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६४ लाख ६३ हजार ९३२ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.६४ टक्के इतके आहे.
क्लिक करा आणि वाचा- किरीट सोमय्या यांना कोर्टाचे समन्स, काँग्रेसने ठोकला मानहानीचा दावा
मुंबईत सर्वाधिक रुग्णवाढ
आज राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या १२ हजार ४१० इतकी आहे. काल ही संख्या १३ हजार ३११ या बरोबरच राज्यातील दैनंदिन रुग्णवाढीचा विचार करता सर्वात जास्त रुग्णवाढ आज मुंबई महानगरपालिका क्षेत्रात झाली आहे. मुंबईत एकूण ३३९ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. तर त्या खालोखाल पुणे जिल्ह्यात आज १११ नवे रुग्ण वाढले आहेत. तर अहमदनगर जिल्ह्यात ही संख्या ८६ इतकी आहे.
त्या खालोखाल ठाणे महापालिका क्षेत्रात एकूण ५४ नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. रायगडमध्ये ही संख्या १९ इतकी आहे.
क्लिक करा आणि वाचा- हाजी अराफत शेख मलिकांवर संतापले; म्हणाले, ‘उद्या जगाला सर्व सांगणार’
नाशिकमध्ये १७, सोलापुरात २३, साताऱ्यात ही संख्या २९, कोल्हापूर मनपा क्षेत्रात ६, सांगलीत ८, रत्नागिरीत ५, तर सिंधुदुर्गात ६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.
तसेच औरंगाबादमध्ये आज १० नवे रुग्ण आढळले असून परभणीत ३ रुग्ण आढळले आहेत.
तर, उस्मानाबादमध्ये ४, बीडमध्ये ६ रुग्ण आढळले आहेत. नागपूर मनपाक्षेत्रात ९ रुग्ण आढळले आहेत.
क्लिक करा आणि वाचा- रियाज भाटीचे तर शरद पवार, उद्धव ठाकरेंसोबत फोटो; शेलारांचे मलिकांना प्रत्युत्तर
१,२९,७१४ व्यक्ती होम क्वारंटाइन
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ६ कोटी ३५ लाख २२ हजार ५४६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६ लाख २० हजार ४२३ (१०.४२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख २९ हजार ७१४ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, ८७० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.