मुंबईत नगरसेवकांची संख्या वाढवण्याच्या निर्णयानंतर शिवसेनेवर गंभीर आरोप


हायलाइट्स:

  • नगरसेवकांची संख्या वाढवण्यास आज राज्य मंत्रिमंडळाची मान्यता
  • राज्य सरकारच्या निर्णयावर भाजपची जोरदार टीका
  • शिवसेनेवर केला गंभीर आरोप

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांची संख्या वाढवण्यास आज राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे आता महानगरपालिकेच्या निर्वाचित सदस्य-नगरसेवकांची संख्या २३६ एवढी होणार आहे. मात्र राज्य सरकारच्या या निर्णयावर भाजपने जोरदार टीका केली आहे.

‘राज्य सरकारने मुंबई महानगरपालिकेत फक्त नऊच नगरसेवक वाढवण्याचा निर्णय का घेतला? याला काही लोकसंख्येचा किंवा जनगणनेचा आधार आहे का? केवळ राजकीय सोयीसाठी आणि तोंडावर आलेली महापालिकेची निवडणूक पुढे ढकलण्यासाठी हा निर्णय महाविकास आघाडीतील शिवसेनेनं घेतला आहे,’ असा आरोप भाजप प्रवक्ते आणि नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनी केला आहे.

Uddhav Thackeray: ‘मान वर करायलाही वेळ मिळत नव्हता आणि…’; अ‍ॅडमिट होण्याआधी मुख्यमंत्र्यांचं पत्र

‘मंत्रिमंडळात हा निर्णय यापूर्वीही घेता आला असता. सर्व महापालिकांमध्ये १५ टक्के जागा वाढवण्यात आल्या, पण मुंबईत तेव्हा जागा वाढवल्या नाहीत. आता प्रभागांची केवळ रचना बदलून आपल्याला निवडणूक जिंकता येणार नाही, त्यामुळे सदस्यसंख्या वाढवून प्रभागांची पूर्ण रचनाच बदलता यावी, या राजकीय हेतूने हा निर्णय घेण्यात आला आहे. हे निवडणुकीला घाबरलेले आहेत,’ असा घणाघातही भाजपच्या भालचंद्र शिरसाट यांनी केला.

haji arafat shaikh: हाजी अराफत शेख मलिकांवर संतापले; म्हणाले, ‘उद्या जगाला सर्व सांगणार’

नेमका काय आहे सरकारचा निर्णय?

मुंबई महानगरपालिका अधिनियमातील (१८८८ चा ३) कलम ५ मध्ये महानगरपालिकेच्या निर्वाचित सदस्यांची संख्या २२७ इतकी आहे. ही संख्या २००१ च्या जनगणनेच्या आकडेवारी आधारे निश्चित केलेली आहे. २०११ च्या जनगणनेनंतर निर्वाचित सदस्यांच्या संख्येत बदल करण्यात आलेला नाही व ही सदस्य संख्या कायम राहिली. २०११ च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार २००१ ते २०११ या दशकात बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात लोकसंख्येमध्ये ३.८७ टक्के इतकी वाढ झाली आहे.

लोकसंख्येमध्ये झालेली ही वाढ, वाढते नागरीकरण याबाबी विचारात घेऊन वाढीव प्रतिनिधीत्व निश्चित करणे आवश्यक होतं. त्यानुसार निर्वाचित सदस्यांची संख्या वाढवण्याचं ठरवण्यात आलं आणि निर्वाचित सदस्य म्हणजेच नगरसेवकांची संख्या २३६ अशी करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: