नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी भारताच्या संघाची निवड मंगळवारी करण्यात आली. भारताच्या या संघात अशा एका खेळाडूची निवड झाली आहे जो एमीबीए झाला आहे. त्यानंतर त्याने ‘सीए’ची परीक्षाही पास केली आहे. त्यानंतर या खेळाडूला मल्टीनॅशनल कंपन्यांमधून नोकरीच्या ऑफर्सही मिळत होत्या. पण त्याने या ऑफर्स नाकारल्या आणि फक्त क्रिकेटवर लक्ष केंद्रीत केले. आता तर त्याला चांगलीच लॉटरी लागली असून त्याची निवड थेट भारतीय संघात झाली आहे. हा खेळाडू आहे कोलकाता नाइट रायडर्समधून चमकलेला वेंकटेश अय्यर.
वेंकटेश हा इंदोरचा. दिनेश शर्मा या प्रशिक्षकांनी वेंकटेशमधले गुण हेरले आणि या हिऱ्याला कोंदण देण्याचे काम केले. वेंकटेश हा धडाकेबाज सलामीवीर म्हणून समोर आला असला तरी तो एक उत्तम अष्टपैलू खेळाडू आहे. आयपीएलमध्ये ३७० धावा करण्याबरोबर त्याने तीन विकेट्सही मिळवल्या आहेत. आयपीएलमधील दिग्गज संघांना वेंकटेशने चांगलाच घाम फोडला होता. सलामीला येत वेंकटेशने नावाजलेल्या गोलंदाजांना आपल्यापुढे लोटांगण घालण्यास भाग पाडले होते. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत पाच सलामीवीरांची निवड करण्यात आली आहे, त्यामधला एक वेंकटेश आहे. पण या सलामीवीरांपेक्षा वेंकटेश नक्कीच वेगळा आहे. कारण वेंकटेश हा भेदक गोलंदजीही करू शकतो, त्यामुळे सलामीवीर आणि उपयुक्त गोलंदाज अशा दोन्ही जबाबदाऱ्या तो पार पाडू शकतो.
वेंकटेश हा अभ्यासामध्येही हुशार आहे. वेंकटेशने फायनान्समध्ये एमबीएची पदवी मिळवलेली आहे. त्याचबरोबर सीएच्या कोर्समधील फाऊंडेशन आणि इंटर या दोन्ही परीक्षा त्याने पास केलेल्या आहे. पण वेंकटेशला क्रिकेटमध्ये जास्त रस होता. आई-वडिलांचाही त्याला चांगला पाठिंबा मिळाला, त्यामुळेच मल्टीनॅशनल कंपनीकडून आलेल्या नोकरीच्या ऑफर्स त्याने स्विकारल्या नाहीत आणि त्याने क्रिकेटवर लक्ष केंद्रित केले. स्थानिक क्रिकेटमध्ये वेंकटेश दमदार कामगिरी करत होता. पण वेंकटेश जेव्हा कोलकाता नाइट रायडर्सकडून सलामीला येऊन धडाकेबाज फलंदाजी करायला लागला तेव्हा तो सर्वांच्या नजरेत भरला आणि त्यामुळेच त्याची भारतीय संघात निवड झाली आहे.
Source link
Like this:
Like Loading...