नवजात बाळाला दुर्मिळ आजार; ६० वर्षाच्या वृद्धासारखे दिसू लागले!


जोहान्सबर्ग: दक्षिण आफ्रिकेत एक वेगळेच प्रकरण समोर आले आहे. नुकतेच जन्माला आलेले बाळ चक्क एखाद्या वृद्धासारखे दिसू लागले. या नवजात बाळाला पाहिल्यानंतर आई-वडिलांना धक्काच बसला. घरी प्रसुती झालेल्या आई आणि बाळाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. त्यावेळी बाळाला दुर्मिळ आजार असल्याची माहिती समोर आली.

‘मिरर’ या वृत्तसंकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, दक्षिण आफ्रिकेतील ईस्टर्न केपमधील एका छोट्या शहरात हे प्रकरण समोर आले. या शहरात ३० ऑगस्ट रोजी एका २० वर्षाच्या महिलेची घरीच प्रसुती झाली. या महिलेने मुलीला जन्म दिला. ही प्रसुती आयाने पार पाडली. मात्र, बाळाचा जन्म झाल्यानंतर आया आणि नवजात मुलीची आई दोघेही घाबरले. या मुलीचे हात विचित्र होते त्याशिवाय बाळाच्या त्वचेवर सुरकुत्या पडल्या होत्या.

पाहा: न्यूयॉर्कला मुसळधार पावसाने झोडपले; सात ठार, अनेक ठिकाणी पूर सदृष्य स्थिती!
कुटुंबातील अन्य सदस्यांनीदेखील नवजात बाळाला पाहिल्यानंतर हैराण झाले. बाळ आणि आईला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. अखेर रुग्णालयात बाळाला दुर्मिळ आजार असल्याचे समजले. बाळाला प्रिजोरिया आजार आहे. प्रिजोरिया आजाराला इतर नावानेही ओळखले जाते. हा आजार असलेल्या व्यक्ती अधिक वयाच्या दिसू लागतात. प्रिजोरिया बाधित नवजात बाळाला आणि आईला रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहे.

करोनाचा आणखी वेरिएंट; लस निष्प्रभ ठरण्याची भीती: WHO
ब्रिटनमध्येही असेच प्रकरण

हा आजार झालेल्या व्यक्ती अधिक काळ जिवंत राहू शकत नाही. काही काळापूर्वी ब्रिटनमध्येही प्रिजोरियाचे प्रकरण समोर आले होते. एका १८ वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला होता. ही मुलगी वयाच्या तुलनेत शंभरी ओलांडलेल्या वृद्धेसारखी दिसत होती. या आजारामुळे डोक्यावरील सगळे केस गळून गेले होते. तर, दातही शिल्लक नव्हते.

‘या’ शहरात आता वाहनांसाठी वेगमर्यादा प्रतितास ३० किमी !

आजारात प्राण जाण्याचा धोका

प्रिजोरिया सिंड्रोमशिवाय बेंजामिन बटन कंडिशन म्हणून ओळखले जाते. हा दुर्मिळ आजार आहे. मात्र, या आजाराची बाधा असल्यास दोन वर्षानंतर मुलांमध्ये लक्षणे दिसण्यास सुरुवात होते. या आजारामध्ये मुलांचे केस गळतात. वाढ खुंटते. हा आजार जीवघेणा आहे.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: