बळीराजा शेतकरी संघटनेचे बेमुदत धरणे आंदोलन

पंढरपूर - बळीराजा शेतकरी संघटनेचे उसाला एफआरपी अधिक सहाशे रुपये मिळावेत या मागणीसाठी गेली चार दिवस कराड तहसीलपुढे बेमुदत धरणे आंदोलन चालू आहे.
यावेळी केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील म्हणाले, पेट्रोल डिझेल घरगुती गॅस व रासायनिक खताच्या किमती पाहता शेतकऱ्यांना उसाची एफआरपी प्लस सहाशे रुपये मिळणे अत्यंत गरजेचे आहे गेल्या वर्ष ते दीड वर्षापासून कोरोनाच्या काळा पासून शेतकरी हा पूर्णतः आर्थिक अडचणीत आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आपल्या हक्काच्या दामासाठी संघर्ष करण्याची तयारी ठेवावी लागत आहे जोपर्यंत शेतकऱ्यांना एफआरपी प्लस सहाशे रुपये मिळणार नाहीत तोपर्यंत हे आंदोलन मागे हटणार नाही.
यावेळी प्रदेशाध्यक्ष बीजी पाटील म्हणाले की,सहकार मंत्र्यांना डीसीसी बँकेच्या निवडणुकीसाठी वेळ आहे परंतु शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाही ही मोठी शोकांतिका आहे .
या आंदोलनात बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील,प्रदेशाध्यक्ष बीजी पाटील, सातारा अध्यक्ष साजिद मुल्ला व विश्वास जाधव तसेच सोलापूर जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जवळेकर,जिल्हा कार्याध्यक्ष किसन खोचरे, जिल्हा उपाध्यक्ष रमेश भोसले, माढा तालुकाध्यक्ष राजेंद्र डोके, तालुका उपाध्यक्ष पंडीत पाटील, संपर्कप्रमुख तानाजी पाटील, रामेश्वर लोंढे, दादा यादव,सागर कांबळे आदीसह शेतकरी उपस्थित होते.