विराटचा विश्वविक्रम; सचिनसह ७ दिग्गजांना मागे टाकले


लंडन: इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत विराटने एक धाव घेताच विक्रमला गवसणी घातली. भारत आणि इंग्लंड यांच्यात द ओव्हल मैदानावर चौथी कसोटी सुरू झाली आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले. पहिल्या सत्रात भारताने ३ बाद ५४ धावा केल्या आहेत. सलामीवीर रोहित शर्मा ११ , केएल राहुल १७ तर चेतेश्वर पुजारा ४ धावांवर बाद झाले.

वाचा- टी-२० क्रिकेटमध्ये आयर्लंडने इतिहास घडवला; भारत, ऑस्ट्रेलियाला मागे टाकले

भारतीय डावात विराटने वैयक्तीक एक धाव घेताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या २३ हजार धावा पूर्ण झाल्या. अशी कामगिरी करणारा तो तिसरा भारतीय खेळाडू आहे. याआधी राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर यांनी अशी कामगिरी केली आहे. सचिनच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३४ हजार ३५७ धावा तर राहुल द्रविडच्या नावावर २४ हजार ६४ धावा आहेत.

वाचा- गेल्या ५० वर्षात भारतीय संघाला ही गोष्ट जमली नाही; विराट आणि कंपनीसमोर इतिहास बदलण्याचे..

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत कोहली आता सातव्या क्रमांकावर आहे. हा विक्रम करताना विराटने आणखी एक पराक्रम केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने २३ हजार धावा करण्याचा विक्रम त्याने स्वत:च्या नावावर केलाय.

वाचा-अश्विन पुन्हा संघाबाहेर; बेजबाबदार संघ निवडीवर माजी कर्णधाराची जोरदार टीका

विराटने फक्त ४९० आंतरराष्ट्रीय डावात २३ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. सचिनने ५२२ डावात २३ हजार धावा केल्या होत्या. तर रिकी पॉन्टिंगने ५४४ डावात ही कामगिरी केली होती. जॅक कॅलिसने ५५१ डावात आणि श्रीलंकेच्या कुमार संगकाराने ५६८ डावात २३ हजारचा टप्पा पार केला होता.

वाचा-कसोटी क्रिकेटमधील सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम मोडीत; जेम्स एडरसन पोहोचला अव्वल स्थानी

वाचा- Video: चौथ्या कसोटीत पाहा काय झाले, रोहित शर्माला देखील विश्वास बसला नाही

धोनीचा विक्रम मागे टाकला

विराटने या डावात माजी कर्णधार धोनीचा विक्रम देखील मागे टाकला. इंग्लंडमध्ये सर्वाधिक सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व करणारा तो कर्णधार झाला आहे. धोनीने ९ सामन्यात इंग्लंडमध्ये नेतृत्व केले होते. विराटने १० सामन्यात देशाचे नेतृत्व केले आहे.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: