तालिबानच्या विजयाचा आनंद अल्पजीवी ठरणार?; सप्टेंबर अखेरीस ‘हे’ मोठे आव्हान!


काबूल: दोन दशकानंतर अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्याचा आनंद साजरा करणाऱ्या तालिबानींचा आनंद क्षणभुंगर ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तालिबानींनी देश ताब्यात घेतल्यानंतर अराजकता निर्माण झाली आहे. आता अफगाणिस्तानमधील खाद्यान्न भांडार या महिन्याच्या अखेरीस संपणार आहे. त्यामुळे अफगाणिस्तानमध्ये भूकबळींची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

संयुक्त राष्ट्राचे अधिकारी Ramiz Alakbarov यांनी म्हटले की, अफगाणिस्तानमधील एक तृतीयांश लोकसंख्या उपासमारीच्या संकटाचा सामना करत आहे. येत्या काही दिवसांत थंडीचे दिवस सुरू होतील. अफगाणिस्तानमध्ये काही ठिकाणी दुष्काळाची परिस्थिती आहे. अशा स्थितीत अन्नधान्य खरेदी करण्यासाठी लोकांना अधिक पैशांची गरज भासणार. सध्या संयुक्त राष्ट्राकडून हजारो अफगाण नागरिकांना जेवण वाटप केले जात आहे.

पंजशीर खोऱ्यात १३ तालिबानी ठार; नॉर्दर्न अलायन्सने दिला झटका!
मात्र, एकूण १.३ अब्ज अमेरिकन डॉलरच्या मदतीपैकी फक्त ३९ टक्के मदत पोहचली आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत अफगाणिस्तानमध्ये अन्नधान्य संकट निर्माण होऊ शकते.

होय, तालिबानला आम्हीच मदत केली; पाकिस्तानच्या मंत्र्याची कबुली
अफगाणिस्तानच्या सत्तेची सूत्रे हाती घेणाऱ्या तालिबान सरकारसमोर सध्या फक्त उपासमारीचे संकट नसून अन्य आव्हानेदेखील आहेत. मागील सरकारने आर्थिक चणचणीमुळे अनेकांचे पगार रोखले होते. हजारो कर्मचारी वेतनाशिवाय काम करत आहेत. अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. बँकांनीही नागरिकांना पैसे काढण्यासाठी मर्यादा लागू केली आहे. अशा अनेक आव्हानांचा सामना तालिबानला करावा लागणार आहे.

अफगाणिस्तानमधून माघार घेणारा अमेरिकेचा ‘तो’ अखेरचा जवान कोण?
सध्या तालिबान सरकार परदेशातून येणाऱ्या निधीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून राहावे लागणार आहे. मात्र, तालिबानने दिलेली आश्वासने पूर्ण केल्यानंतरच त्यांना परदेशातून मदत मिळणार आहे. यामध्ये महिलांना समान हक्क, अधिकार, दहशतवाद्यांना आश्रय न देणे आदी अटी आहेत. तालिबानने या अटी, आश्वासने पूर्ण केल्यास काही प्रमाणात परदेशातून मदत उपलब्ध होऊ शकते. अन्यथा अफगाणिस्तानमधील परिस्थिती आणखी चिघळू शकते.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: