शेअर बाजार; सेन्सेक्स-निफ्टीला तेजीची हुलकावणी , बाजारात लाल निशाण


हायलाइट्स:

  • बाजारात पुन्हा नकारात्मक वातावरण तयार झाले होते.
  • बाजार बंद होताना सेन्सेक्स ८० अंकांनी घसरला. निफ्टीत २७ अंकाची घट झाली.
  • सलग दुसऱ्या सत्रात सेन्सेक्समध्ये घसरण झाली.

मुंबई : महत्वाच्या शेअरमध्ये नफावसुली झाल्याने आज बुधवारी बाजारात पुन्हा नकारात्मक वातावरण तयार झाले होते. बाजार बंद होताना सेन्सेक्स ८० अंकांनी घसरला. निफ्टीत २७ अंकाची घट झाली. सलग दुसऱ्या सत्रात सेन्सेक्समध्ये घसरण झाली.

‘पद्मभूषण’साठी मी अपात्र! जाणून घ्या उद्योगपती आनंद महिंद्रा असं का म्हणाले…
आज भांडवली बाजारात नायकाच्या शेअरने दमदार एंट्री घेतली. नायकाचा शेअर तब्बल ९० टक्के अधिक दराने शेअर बाजारात सूचिबद्ध झाला. सेन्सेक्समध्ये ३० पैकी १३ शेअर वधारले आहेत तर १७ शेअरमध्ये घसरण झाली आहे. ज्यात टीसीएस, एसबीआय, एनटीपीसी, कोटक बँक, आयसीआयसीआय बँक, अल्ट्राटेक सिमेंट, एशियन पेंट, एचयूएल, मारुती, इंडसइंड बँक, टाटा स्टील या शेअरमध्ये घसरण झाली आहे. महिंद्रा, भारती एअरटेल, सन फार्मा, रिलायन्स, आयटीसी, बजाज फिनसर्व्ह, नेस्ले, एचसीएल टेक, इन्फोसिस हे शेअर वधारले आहेत.

सोनं झालं स्वस्त, चांदी महागली ; जाणून घ्या आजचा सोने-चांदीचा भाव
जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढत आहे. परिणामी नजीकच्या काळात महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

गुंतवणुकीची शेवटची संधी; Paytm IPO साठी अर्ज करण्यासाठी काही तास शिल्लक
एनएसईवर वोडाफोन, टाटा पॉवर, पीएनबी, टाटा मोटर्स या शेअरमध्ये तेजी आहे तर सेल, भारत हेवी इलेक्ट्रिक हे शेअर घसरले आहेत. बाजार बंद होताना सेन्सेक्स ८० अंकांनी घसरला आणि तो ६०३५२ अंकांवर स्थिरावला. निफ्टी २७ अंकांच्या घसरणीसह १८०१७ अंकावर बंद झाला.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: