पंजशीर खोऱ्यात १३ तालिबानी ठार; नॉर्दर्न अलायन्सने दिला झटका!


काबूल: अफगाणिस्तानमध्ये तालिबान आणि नॉर्दर्न अलायन्समध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे. पंजशीर खोऱ्यात घुसलेल्या तालिबानींना नॉर्दर्न अलायन्सने तालिबानला जोरदार धक्का दिला. नॉर्दर्न अलायन्सच्या सैन्याने तालिबानचा एक रणगाडा उद्धवस्त केला. या हल्ल्यात १३ तालिबानी ठार झाले. पंजशीरचा ताबा मिळवण्यासाठी तालिबानकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

बंडखोरांच्या ट्विटर अकाउंटवर दिलेल्या माहितीनुसार, पंजशीर प्रांतातील चिकरिनोव जिल्ह्यात बंडखोरांनी रचलेल्या सापळ्यात अडकून १३ तालिबानी ठार झाले. तालिबानचा एक रणगाडादेखील उद्धवस्त झाला आहे. अहमद मसूद यांचे प्रवक्ता फहीम दाष्टि यांनी म्हटले की, ही चकमक पंजशीर खोऱ्याच्या पश्चिम प्रवेशद्वाराजवळ झाली. या ठिकाणी तालिबानने हल्ला केला होता.

होय, तालिबानला आम्हीच मदत केली; पाकिस्तानच्या मंत्र्याची कबुली

तालिबान धक्का! ३५० ठार, ४० हून अधिक ताब्यात; नॉर्दर्न अलायन्सचा दावा
फहीम यांनी सांगितले की, तालिबानने हा हल्ला संभवत: पंजशीर खोऱ्यात सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी केला होता. मात्र, प्रत्युत्तराच्या कारवाईत तालिबानी रणगाडा उद्धवस्त झाला. या चकमकीत बंडखोरांचे दोन सैनिकदेखील जखमी झाले आहेत. याआधीच्या हल्ल्यातही तालिबानींना मोठा धक्का बसला होता.

तालिबानींचा क्रूरपणा; लोकगीत गायकाची केली हत्या
आतापर्यंत सोव्हिएत संघ अथवा तालिबानला पंजशीर प्रांतावर विजय मिळवता आला नाही. पंजशीर खोऱ्यात सध्या मोठ्या संख्येने तालिबान विरोधक एकवटले आहेत. यामध्ये अफगाणिस्तान सैन्यातील अधिकारी, जवानदेखील दाखल झाले आहेत.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: