कसोटी क्रिकेटमधील सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम मोडीत; जेम्स एडरसन पोहोचला अव्वल स्थानी


लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याला द ओव्हल मैदानावर सुरूवात झाली आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ सध्या १-१ अशा बरोबरीत आहेत. दोन्ही संघांसाठी ही चौथी कसोटी महत्त्वाची आहे. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

वाचा- चौथ्या कसोटीसाठी असा आहे भारतीय संघ; या दोघांना बाहेर बसवले

चौथ्या कसोटीसाठी दोन्ही संघांनी प्रत्येकी दोन बदल केले आहेत. भारताने इशांत शर्मा आणि मोहम्मद शमीच्या जागी उमेश यादव आणि शार्दुल ठाकूर यांना स्थान दिले आहे. तर इंग्लंडने जोस बटलर आणि सॅम करनच्या जागी ओली पोप आणि ख्रिस वोक्स यांना संधी दिली आहे.

वाचा- टी-२० क्रिकेटमध्ये आयर्लंडने इतिहास घडवला; भारत, ऑस्ट्रेलियाला मागे टाकले

या सामन्यात मैदानावर येताच इंग्लंडचा दिग्गज जलद गोलंदाज जेम्स एडरसनने एक मोठा विक्रम स्वत:च्या नावावर केला. हा विक्रम करताना त्याने भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला. कसोटी क्रिकेटमध्ये घरच्या मैदानावर सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याचा विक्रम आता एडरसनच्या नावावर झाला आहे. भारताविरुद्धची चौथी कसोटी ही त्याची घरच्या मैदानावरील ९५वी कसोटी आहे. सचिन तेंडुलकरने घरच्या मैदानावर ९४ कसोटी सामने खेळले आहेत. सचिनच्या नावावर सर्वाधिक म्हणजे २०० कसोटी खेळण्याचा विक्रम आहे.

वाचा-टी-२० मध्ये न्यूझीलंडचा लाजिरवाणा विक्रम; बांगलादेशच्या गोलंदाजांपुढे

घरच्या मैदानावर सर्वाधिक कसोटी सामने खेळणारे खेळाडू

जेम्स एडरसन, इंग्लंड – ९५
सचिन तेंडुलकर, भारत- ९४
रिकी पॉन्टिंग, ऑस्ट्रेलिया- ९२
अॅलिस्टर कुक, इंग्लंड- ८९
स्टीव्ह वॉ, ऑस्ट्रेलिया- ८९
जॅक कॉलिस, दक्षिण आफ्रिका- ८८

वाचा- चौथ्या कसोटीच्या २४ तास आधी हिटमॅन रोहितने दिला विराटला धक्का; तर…Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: