रवी शास्त्रींना चक्क पाकिस्तानच्या खेळाडूने दिले या पदासाठी आमंत्रण, भावनिक पोस्ट झाली व्हायरल…


नवी दिल्ली : आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेतील भारतीय क्रिकेट संघाचा प्रवास साखळी सामन्यातच संपुष्टात आला. यासह मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळही संपला आहे. प्रशिक्षक पदाचा कार्यकाळ वाढविणार नाही, असे शास्त्री यांनी टूर्नामेंट सुरू होण्यापूर्वीच जाहीर केले होते. शास्त्रींच्या जागी राहुल द्रविडची टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रमने शास्त्री यांच्या निरोपाप्रसंगी एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. विराट कोहलीच्या कर्णधारपदावरही अक्रमने आपले मत मांडले आहे. टी-२० कर्णधार म्हणून कोहलीचा शेवटचा सामना नामिबियाविरुद्ध होता.

अक्रमने सोशल मीडियातून शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘टी-२० कर्णधार म्हणून विराट कोहलीसारख्या चॅम्पियन खेळाडूचा शानदार निरोप. टी-२० कर्णधारपदाच्या शेवटच्या दिवशी आम्ही त्याचे नेतृत्व पुन्हा एकदा पाहिले, जेव्हा त्याने सूर्यकुमार यादवला नामिबियाविरुद्धचा सामना संपवण्यासाठी फलंदाजीसाठी पाठवले. जेव्हा तो हे काम स्वतः करू शकला असता. चांगल्या कामगिरीचे श्रेय नामिबियालाही जाते, पण माझे मन माझे मित्र रवी शास्त्री यांच्यासोबत आहे. वेल डन, कॉमेंट्री बॉक्समध्ये परत ये मित्रा.’

अक्रमने नंतर ‘ए स्पोर्ट्स’ शो दरम्यान शास्त्री यांनी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून चार वर्ष केलेल्या कामगिरीचे कौतुक केले. शास्त्रींना कॉमेंट्री बॉक्समध्ये परतण्यासाठी दरवाजे खुले असल्याचेही त्यांनी सांगितले. शास्त्री नवीन आयपीएल संघ अहमदाबाद फ्रँचायझीसोबत काम करू शकतात, अशा बातम्या काही माध्यमातून प्रसिद्ध झाल्या आहेत. अक्रम म्हणाले की, ‘माझा चांगला मित्र, शॅजी. प्रशिक्षक म्हणून ही तुमची शेवटची स्पर्धा होती आणि मला वाटते की, तुम्ही गेल्या तीन वर्षांत चांगली कामगिरी केली आहे.’

रवी शास्त्री यांनी एक समालोचक म्हणून चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. पण त्यानंतर ते भारतीय संघात आले. पण आता शास्त्री यांना आयपीएलमधील एका संघाने प्रशिक्षकपदाची ऑफर दिल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे शास्त्री आता समालोचन करणार की प्रशिक्षकपद भूषवणार, याची उत्सुकता सर्वांनाच असेल.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: