Yogi Adityanath: २६/११ हल्ल्याची पुनरावृत्ती? योगींच्या दौऱ्याआधी मेरठ रेल्वे स्टेशन उडवून देण्याची धमकी


हायलाइट्स:

  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२
  • मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उद्या मेरठ दौऱ्यावर
  • २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याची पुनरावृत्ती करण्याचा पत्रात दावा

मेरठ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. वेगवेगळ्या पक्षांच्या अनेक नेत्यांचे उत्तर प्रदेश दौरे गाजत आहेत. याच दरम्यान मेरठ रेल्वे स्टेशन बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देणारं एक पत्र आढळल्यानं खळबळ उडालीय. लवकरच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मेरठला भेट देणार आहेत.

उद्या (गुरुवारी) मुख्यमंत्री मेरठ दौऱ्यावर

मेरठ कृषी विद्यापीठात ११ नोव्हेंबर रोजी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पॅराऑलम्पिक खेळाडुंना सन्मानित केलं जाणार आहे.

२६/११ च्या दहशतवादी हल्ल्याची पुनरावृत्ती?

मंगळवारी सायंकाळी मेरठ स्टेशन मास्तरांना हे पत्र मिळालंय. यात २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याची पुनरावृत्ती घडवून आणण्यात येईल, असंही या पत्रात म्हटल गेलंय.

‘लष्कर ए तोयबा’चा उल्लेख करत लिहिण्यात आलेलं हे पत्र हिंदीतून लिहिण्यात आलंय. जम्मू-काश्मीरच्या मोहम्मद अजीज नावानं हे पत्र लिहिण्यात आलंय.

Indian Railway: रेल्वेकडून सर्वसामान्यांना दिलासा, करोनाकाळातील दरवाढ कमी होणार
VIDEO : जोधपूर अपघाताचा अंगावर शहारे उभे करणारा व्हिडिओ
अलर्ट घोषित

हे पत्र मिळाल्यानंतर तातडीनं मेरठ शहर रेल्वे स्टेशन बाहेर आणि आजुबाजुचा परिसराचं छावणीत रुपांतर झालंय. सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ करण्यात आलीय. तसंच अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

स्टेशनवर येणाऱ्या – जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या आधार कार्डाची पडताळणी केली जातेय. सोबतच मेटल डिटेक्टरच्या सहाय्यानंही तपासणी सुरू आहे. स्टेशनवर डॉग स्क्वॉडचीही मदत घेतली जातेय.

मेरठ विभागाचे एडीजी राजीव सबरवाल, आयजी प्रवीण कुमार, एसएसपी प्रभाकर चौधरी यांच्यासहीत अनेक अधिकारी रेल्वे स्टेशनच्या सुरक्षा यंत्रणेचा आढावा घेण्यासाठी उपस्थित झाले आहेत.

धमकीच्या पत्रांचा सिलसिला

उल्लेखनीय म्हणजे, यापूर्वी गाझियाबादसहीत हापूड, शामली, सहारनपूर, बुलंदशहर, मुजफ्फरनगर, मुरादाबाद यांसारख्या या ठिकाणांतही अशा आशयाचं पत्र आढळल्याचं समोर आलं होतं.

Manjamma Jogati: भीक मागून उदरनिर्वाह ते ‘पद्मश्री’… मंजम्मा जोगतींच्या जगण्याची कहाणी!
Tulsi Gowda: ‘जंगलाच्या एनसायक्लोपेडिया’ पद्मश्री तुलसी गौडा यांच्याबद्दल जाणून घ्या…Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: