Influential Persons on Twitter: पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरले जगातील सर्वाधिक प्रभावशाली ‘राजकीय नेते’


हायलाइट्स:

  • जगातील सर्वाधिक प्रभावशाली व्यक्तींमध्ये मोदी दुसऱ्या स्थानावर
  • पहिल्या क्रमांकावर अमेरिकनं गायिका टेलर स्विफ्ट
  • तर दुसऱ्या क्रमांकावर पंतप्रधान मोदी
  • यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचाही समावेश

नवी दिल्ली : वर्ष २०२१ मध्ये मायक्रोब्लॉगिंग वेबसाईट ट्विटरवर सर्वाधिक प्रभावशाली ठरलेल्या नावांची यादी जाहीर करण्यात आलीय. या यादीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वाधिक प्रभावशाली ‘राजकीय नेते‘ ठरलेत.

जगातील प्रभावशाली व्यक्तींमध्ये राजकीय नेते असलेल्या मोदींना मागे टाकत अमेरिकन गायिक टेलर स्विफ्ट हिनं पहिला क्रमांक पटकावलाय तर नरेंद्र मोदी या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

सचिन तेंडुलकर ३५ व्या क्रमांकावर

कन्झ्युमर इन्टेलिजन्स कंपनी ‘ब्रँडवॉच’नं वार्षिक रिसर्चच्या आधारावर ही यादी तयार केलीय. या यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावाचाही समावेश आहे. सचिनला या यादीत ३५ वं स्थान मिळालंय. क्रिकेटशिवाय सचिन तेंडुलकर यांनी राज्यसभा सदस्यही होते. जवळपास दशकभराहून अधिक वेळेपासून ते ‘युनिसेफ’शी निगडीत आहेत. २०१३ मध्ये दक्षिण आशियाचे राजदूत म्हणूनही त्यांची नियुक्ती झाली होती.

या यादीत अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांच्या पत्नी – वकील मिशेल ओबामा यांचाही समावेश आहे. या यादीत ‘देसी गर्ल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रियांका चोप्राचा तिचा पती निक जोनास याच्या नावाचाही समावेश आहे. याशिवाय निकी मिया, बेयॉन्स, लुईस टॉमलिंसन, ब्रुनो मार्स, लियाम पायने आणि ताकाफुमी होरी यांच्या नावाचाही उल्लेख आहे.

Malala Yousafzai: नोबल पुरस्कार विजेती मलाला युसुफजई अडकली विवाहबंधनात
लसीकरण पूर्ण झालेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना अमेरिकेची दारे खुली

जगभरातील ‘ट्विटर’वर सर्वाधिक प्रभावशाली ठरलेल्या व्यक्ती

५० वा: निक जोनास, संगीतकार – @nickjonas
४९ वा: ड्वेन जॉन्सन, अभिनेता – @TheRock
४८ वा: बेयॉन्स, संगीतकार – @Beyonce Musician
४७ वा: अॅलिसा, कलाकार – @elissakh
४६ वा: डॅनिलो जेंटिली, कॉमेडियन – @DaniloGentili
४५ वा: लिओनार्डो डिकॅप्रियो, अभिनेता – @LeoDiCaprio
४४ वा: एव्‍हरिल लॅविग्ने, संगीतकार – @AvrilLavigne
४३ वा: मिशेल ओबामा, वकील – @MichelleObama
४२ वा: मारिया केरी, संगीतकार – @MariahCarey
४१ वा: निकी मिनाज, संगीतकार – @NICKIMINAJ
४० वा: कॉनन ओ’ब्रायन, टेलिव्हिजन होस्ट – @ConanOBrien
३९ वा: पिंक, संगीतकार – @Pink
३८ वा: ख्रिस ब्राउन, संगीतकार – @chrisbrown
३७ वा: लियाम पेने, संगीतकार – @LiamPayne
३६ वा: लुई टॉमलिन्सन, संगीतकार – @Louis_Tomlinson
३५ वा: सचिन तेंडुलकर, क्रिकेटर – @sachin_rt
३४ वा: ड्रेक, संगीतकार – @Drake
३३ वा: ब्रुनो मार्स, संगीतकार – @BrunoMars
३२ वा: डेमी लोव्हाटो, संगीतकार – @ddlovato
३१ वा: टाकाफुमी होरी, व्यवसाय – @takapon_jp
३० वा: शॉन हॅनिटी, टेलिव्हिजन होस्ट – @seanhannity
२९ वा: रेचेल मॅडो , टेलिव्हिजन होस्ट – @maddow
२८ वा: रिकी गेर्वाईस, कॉमेडियन/अभिनेता – @rickygervais
२७ वा: एमिनेम, संगीतकार – @Eminem
२६ वा: झेन मलिक, संगीतकार – @zaynmalik
२५ वा: हिलरी क्लिंटन, राजकारणी – @HillaryClinton
२४ वा: कान्ये वेस्ट, संगीतकार – @kanyewest
२३ वा: हॅरी स्टाइल्स, संगीतकार – @Harry_Styles
२२ वा: नियाल होरान, संगीतकार – @NialOfficial
२१ वा: ओप्रा विन्फ्रे, टेलिव्हिजन होस्ट – @Oprah
२० वा: मायली सायरस, संगीतकार – @MileyCyrus
१९ वा: लेब्रॉन जेम्स, स्पोर्ट्स – @KingJames
१८ वा: जिमी फॅलन, टेलिव्हिजन होस्ट – @jimmyfallon
१७ वा: शकीरा, संगीतकार – @shakira
१६ वा: जस्टिन टिम्बरलेक, संगीतकार – @jtimberlake
१५ वा: सेलेना गोमेझ, संगीतकार – @selenagomez
१४ वा: रिहाना, संगीतकार – @rihanna
१३ वा: जस्टिन बीबर, संगीतकार – @justinbieber
१२ वा: जेनिफर लोपेझ, संगीतकार / अभिनेता – @JLo
११ वा: बिल गेट्स, व्यवसाय – @BillGates
१० वा: किम कार्दशियन, मीडिया पर्सनॅलिटी – @KimKardashian
९ वा: एलेन डीजेनेरेस , टेलिव्हिजन होस्ट – @TheEllenShow
८ वा: लेडी गागा, संगीतकार – @ladygaga
७ वा: एरियाना ग्रांडे, संगीतकार – @ArianaGrande
६ वा: क्रिस्टियानो रोनाल्डो, स्पोर्ट्स – @Cristiano
५ वा: बराक ओबामा, राजकारणी – @BarackObama
चौथा: एलोन मस्क, व्यवसायिक – @elonmusk
तिसरा: कॅटी पेरी, संगीतकार – @katyperry
दुसरा: नरेंद्र मोदी, राजकारणी – @narendramodi
प्रथम: टेलर स्विफ्ट, संगीतकार – @ taylorswift13

VIDEO : जोधपूर अपघाताचा अंगावर शहारे उभे करणारा व्हिडिओ
Indian Railway: रेल्वेकडून सर्वसामान्यांना दिलासा, करोनाकाळातील दरवाढ कमी होणारSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: