UP Crime: चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या तरुणाचा पोलीस कोठडीत मृत्यू


हायलाइट्स:

  • उत्तर प्रदेशात आणखीन एका तरुणाचा पोलीस कोठडीत मृत्यू
  • तरुणानं आत्महत्या केल्याचा पोलिसांचा दावा
  • पोलिसांनीच आपल्या मुलाची हत्या केल्याचा पीडित कुटुंबाचा दावा

लखनऊ : उत्तर प्रदेशातील कासगंज जनपदच्या पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या एका तरुणाचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झालाय. या घटनेनंतर बेजबाबदारपणाचा ठपका ठेवत पोलीस अधीक्षक रोहन पी बोत्तरे यांनी पाच पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती दिलीय.

एका तरुणीला पळवण्याच्या आरोपाखाली सोमवारी तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. मात्र, तुरुंगातच गळफास लावून तरुणानं आत्महत्या केल्याचं पोलिसांनी म्हटलंय.

‘एरोली गावचा रहिवासी असणाऱ्या अल्ताफला एका मुलीच्या अपहरणाच्या आरोपाखाली चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं होतं. पोलीस चौकशी करत असताना त्यानं बाथरुमला जायचं असल्याचं पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी त्याला इथंच असलेल्या बाथरुममध्ये पाठवलं. परंतु, बराच वेळ तो बाहेर आला नाही म्हणून पोलीस कर्मचाऱ्यांनी इथं जाऊन पाहीलं, तेव्हा त्यानं आपल्या जॅकेटच्या हुडला (टोपी) लावलेल्या नाड्यानं पाईपला गळफास लावलेलं आढळून आलं. यानंतर पोलिसांनी त्याला तत्काळ खाली उतरवत रुग्णालयात हलवलं. पण एव्हाना त्याचा मृत्यू झाला होता’, असं पोलिसांनी म्हटलंय.

epfo alerts account holder : EPFO च्या खातेदारांनो सावधान… अन्यथा PF Account होईल रिकामे!
kcr – arvind dharmapuri : ‘मुख्यमंत्री केसीआर यांचे राजकीय मरण जवळ, त्यांनी मोदींशी पंगा घेतला’

मृत तरुणाच्या कुटुंबीयांचा पोलिसांवर आरोप

दुसरीकडे, मृत तरुणाच्या कुटुंबानं मात्र पोलिसांचा हा दावा फेटाळून लावलाय. या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण दिसून येतंय.

मृत तरुणाचं नाव सय्यद अल्ताफ असल्याचं समजतंय. तरुणाच्या पित्याच्या म्हणण्यानुसार, अल्ताफला अगोदरच्या दिवशी पोलिसांनी एका तरुणीच्या अपहरणाच्या आरोपाखाली सोमवारी ताब्यात घेतलं होतं. चौकशीसाठी तरुणाला नदरई गेटच्या चौकीत आणण्यात आलं होतं. आपल्या मुलासोबत आलेल्या पित्याला इथून पोलिसांनी हाकलून दिलं. त्यानंतर तरुणाला पोलीस स्टेशनला आणण्यात आलं. पोलिसांनीच आपल्या मुलाला फासावर चढवलं आणि या हत्येला आत्महत्येचं स्वरुप दिलं, असा आरोपही तरुणाच्या पित्यानं केलाय.

तरुणीच्या अपहरणाचा गुन्हा आपल्या मुलावर दाखल झाल्यानंतर आपण स्वत:च मुलाला पोलिसांकडे सोपवलं होतं. मात्र २४ तासांतच मुलानं गळफास लावून आत्महत्या केल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आल्याचं या दुर्दैवी पित्यानं म्हटलंय.

तुरुंगात तरुण गळफास लावल्याच्या अवस्थेत आढळल्यानंत पोलसांनी तरुणाला जिल्हा रुग्णालयात हलवलं होतं. परंतु, इथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

‘राम’ नावाचं राजकारण : ‘राम हे राजा दशरथाचे पुत्र नव्हे…’ भाजप सहकारी निषाद यांचा दावा
lakhimpur kheri case : मोठा खुलासा… लखीमपूर हिंसाचारात मंत्रिपुत्राच्या बंदुकीतून झाला होता गोळीबार!Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: