गिलानींच्या शोकसंदेशात इम्रान खान यांनी गरळ ओकली; पाकिस्तानचा राष्ट्रध्वज अर्ध्यावर!


इस्लामाबाद: जम्मू-काश्मीरमधील फुटीरतावादी हुरियत कॉन्फरन्सचे नेते सय्यद अली शाह गिलानी यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताविरोधात गरळ ओकली आहे. इम्रान खान यांनी गिलानी यांना ‘पाकिस्तानी’ असल्याचे सांगत पाकिस्तानचा राष्ट्रध्वज अर्ध्यावर आणला जाणार असल्याची घोषणा केली. इम्रान यांनी एक दिवसाचा दुखवटाही जाहीर केला आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ट्विट करून म्हटले की, काश्मिरी नेता सय्यद अली शाह गिलानींच्या निधनाचे वृत्त समजताच दु:ख झाले. गिलानी यांनी आयुष्यभर आपल्या लोकांसाठी आणि त्यांच्या अधिकारांसाठी संघर्ष केला. भारताने त्यांना कैदेत ठेवले आणि त्यांचा छळ केला असल्याचा आरोप इम्रान खान यांनी केला. इम्रान खान यांनी पुढे म्हटले की, पाकिस्तान त्यांच्या संघर्षाला सलाम करत असून आम्ही पाकिस्तानी आहोत, पाकिस्तान आमचा आहे, हे त्यांचे शब्द स्मरणात राहतील असेही इम्रान खान यांनी म्हटले. यावेळी त्यांनी पाकिस्तानचा राष्ट्रध्वज अर्ध्यावर आणण्याची घोषणा केली. पाकिस्तानने गिलानी यांना सर्वोच्च नागरी पुरस्कारानेदेखील सन्मानित केले होते.

गिलानी यांच्या निधनावर पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांनीदेखील शोक व्यक्त करत भारतविरोधी गरळ ओकली. जनरल बाजवा यांनी म्हटले की, गिलानी काश्मीरच्या स्वातंत्र्य आंदोलनात अग्रणी होते.

दरम्यान, जम्मू काश्मीरमध्ये गेल्या तीन दशकांहून अधिक काळापर्यंत फुटीरतावादी गटाचं नेतृत्व करणाऱ्या सैय्यद अली शाह गिलानी यांच्या निधनानंतर खोऱ्यातील परिस्थितीवर सुरक्षायंत्रणांची नजर आहे.कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी काश्मीर खोऱ्यात काही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अफवा रोखण्यासाठी इंटरनेट बंदी लागू केली असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: