नवाब मलिकांच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीसांचे सूचक ट्वीट; म्हणाले…


हायलाइट्स:

  • नवाब मलिकांचे फडणवीसांवर आरोप
  • मलिकांच्या आरोपांवर फडणवीसांचे ट्वीट
  • सूटक ट्वीट करत केला पलटवार

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik)यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्यातील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना लक्ष्य केलं आहे. बनावट नोटा, बनावट पासपोर्ट, बांगलादेशी नागरिकांना संरक्षण अशा अनेक प्रकरणांचा दाखला देत मलिक यांनी फडणवीसांवर गंभीर आरोप केले.

आर्यन खान प्रकरणानंतर नवाब मलिक हे सातत्याने एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आरोप करताना दिसत आहेत. तसंच, आता नवाब मलिकांच्या रडारवर देवेंद्र फडणवीस आहेत. मुख्यमंत्रिपदाच्या काळात फडणवीस यांनी अंडरवर्ल्डमधील काही लोकांना व कुख्यात गुंडांना खुलेआम संरक्षण दिलं होतं, असा आरोप त्यांनी केला आहे. नवाब मलिकांच्या या आरोपांवर आता देवेंद्र फडणवीसांनी अप्रत्यक्षरित्या उत्तर दिलं आहे.

वाचाः हैदर आझमच्या पत्नीचं प्रकरण का दाबलं?; मलिकांचा फडणवीसांना सवाल

देवेंद्र फडणवीसांनी एक ट्वीट केलं आहे. फडणवीसांनी ट्वीटमध्ये एक सुविचार शेअर केला आहे. जॉर्ज बर्नाड शॉ यांचा हा सुविचार आहे. आपण डुकरासोबत कुस्ती खेळू नये, हे मी खूप पूर्वी शिकलोय. डुकरासोबत कुस्ती खेळल्याने आपल्याच अंगावर चिखल उडतो आणि तेच डुकराला आवडतं, असा आशय असलेला सुविचार देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. अप्रत्यक्षरित्या फडणवीसांनी नवाब मलिकांवर निशाणा साधला आहे.

नवाब मलिकांचे आरोप काय?

फडणवीस मुख्यमंत्री असताना अंडरवर्ल्डच्या लोकांना सरकारी कमिशन, सरकारी बोर्डाचे अध्यक्ष का बनवलं?. मुन्ना यादव हा नागपूरचा कुख्यात गुंड आहे. त्याच्यावर हत्येपासून सगळे गुन्हे दाखल आहेत. त्याला कन्स्ट्रक्शन वर्कर बोर्डाचं अध्यक्ष का बनवलं? तुमच्या गंगेत मुन्ना यादव आंधोळ करुन पवित्र झाला का?, असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

वाचाः मुकेश अंबानींच्या अँटिलीयाचा पत्ता विचारणारे ते दोघे कोण होते?; झाला खुलासाSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: