हायलाइट्स:
- पेटीएमचा आयपीओ (IPO) दुसऱ्या दिवशी ४८ टक्के सबस्क्राइब झाला आहे.
- देशातील सर्वात मोठ्या आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याची आज शेवटची संधी आहे.
- या आयपीओमध्ये सुमारे १८,३०० कोटी रुपयांचे एकूण ४.८३ कोटी शेअर्स विक्रीसाठी ऑफर करण्यात आले आहेत
इंधन दर ; जाणून घ्या आजचा तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचा भाव
शेअर बाजारातून मिळालेल्या माहितीनुसार, पेटीएमच्या इश्यूबाबत किरकोळ गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव असलेले ८७.९८ लाख शेअर्स १.२३ वेळा सबस्क्राइब झाले आहेत. पेटीएमची संचालक कंपनी वन ९७ कम्युनिकेशन्स (One 97 Communications Limited) ने पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी सर्वाधिक २.६३ कोटी शेअर्स राखून ठेवले होते.
मोटार विमा मिळणार झटपट; लिबर्टी जनरल इन्शुरन्सची ‘फोन पे’सह भागीदारी
प्राईस बँड
पेटीएमने आपल्या स्टॉकसाठी २,०८० ते २,१५० रुपयांचा प्राइस बँड ठेवला आहे. किंमत श्रेणीच्या वरच्या स्तरावर, कंपनीचे बाजार मूल्यांकन सुमारे १.३९ लाख कोटी रुपये आहे.
इंधन दर ; जाणून घ्या आजचा तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचा भाव
अँकर गुंतवणूकदारांकडून उभारले ८२३५ कोटी
शेअर विक्रीपूर्वी पेटीएमने अँकर गुंतवणूकदारांकडून ८,२३५ कोटी रुपये उभे केले आहेत. पेटीएमने ब्लॅकरॉक (BlackRock), सीपीपी गुंतवणूक मंडळ (CPPIB), बिर्ला एमएफ (MF) आणि इतर गुंतवणूकदारांकडून हा निधी उभारला.
देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ
पेटीएमचा १८,३०० कोटी रुपयांचा हा आयपीओ देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ असेल. आतापर्यंत हा विक्रम कोल इंडिया लिमिटेडकडे होता. २०१० मध्ये १५,००० कोटी रुपयांच्या आयपीओसह बाजारात आले होते.
वन प्लस कम्युनिकेशन्स ही भारतातील ग्राहक आणि विक्रेत्यांसाठीची मोठी डिजिटल इकोसिस्टिम आहे. हे भारतातील सर्वात मोठे पेमेंट प्लॅटफॉर्म आहे. ही कंपनी पेमेंट सेवा, वाणिज्य आणि क्लाउड सेवा आणि आर्थिक सेवा पुरवते. ही कंपनी ३३.७ कोटी ग्राहकांना आणि २.२ कोटींपेक्षा जास्त विक्रेत्यांना आपली सेवा पुरवते.