कुंपणच शेत खातंय! ज्या गावाला वनसुरक्षेची जबाबदारी दिली, तिथलेच लोक निघाले तस्कर


हायलाइट्स:

  • वन्य प्राण्यांच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
  • गोंडपिपरी तालुक्यातील पाचगाव येथून सहा जण ताब्यात
  • वाघाची हाडे, कवटी, कातडीचा तुकडा, हाताचे हाड, मिशीचे तुकडे जप्त

चंद्रपूर: वाघाची शिकार करून त्याच्या अवयवांची तस्करी करताना सहा आरोपींना पकडण्यात आले आहे. आरोपी गोंडपिपरी तालुक्यातील कोठारी वन परिक्षेत्र अंतर्गत पाचगाव येथील असून पाचगाव वनक्षेत्रातच त्यांनी वाघाची शिकार केली होती. या घटनेमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील वाघांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मध्य चांदा वनविभागाच्या कोठारी वनपरिक्षेत्र अंतर्गत पाचगाव येथील महादेव टेकाम याच्यासह इतर आरोपींना वाघाच्या अवयवाची तस्करी करताना नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी वनपरिक्षेत्रातील वनविभागाच्या चमूने नागपूर-चंद्रपूर या महामार्गावर कारवाई करून ताब्यात घेतले आहे. २९ ऑगट रोजी बुटीबोरी वनपरीक्षेत्र अधिकारी एल. व्ही. ठोकळ यांनी ही कार्यवाही केली. ताब्यातील आरोपीची चौकशी केली असता शिकारीचे ठिकाण व सहकारी आरोपी गोंडपीपरी तालुक्यातील पाचगाव येथील असल्याचे सांगितले.

वाचा:कोल्हापूर जिल्ह्यात तलाव फुटला; एका महिलेसह जनावरे वाहून गेली, पिके पाण्यात

वनाधिकारी एल व्ही ठोकळ यांनी कोठारी येथील वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप लंगडे, फिरते पथकाचे वन परिक्षेत्र अधिकारी फनिंद्र गादेवार, विनायक नरखेडकर यांच्यासह पाचगाव गाठले. रामचंद्र आलांम, विजय आलांम, वसंता टेकाम या तिघांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता शिकारीत वापरण्यात आलेल्या साहित्यासह वाघाच्या हाडांच्या फासोड्या, कवटी, कातडीचा तुकडा, हाताचे हाड, मिशीचे तुकडे, मोरपीस, मोराचे पाय, सारस पंख, घुबडाचे पाय, तार फासा हे सगळे जप्त करण्यात आले.

आरोपीच्या सांगण्यावरून वाघाची शिकार केलेल्या वनक्षेत्राचे मोक्यावर जाऊन पंचनामा करण्यात आला. ताब्यात असलेला आरोपी वसंता टेकाम याला अर्धांगवायू असल्याने त्याला मुभा देऊन इतर आरोपींना पुढील कार्यवाहीसाठी वन अधिकाऱ्यांनी बुटीबोरीला नेले आहे. या प्रकरणात पुढील चौकशी सहायक वनसंरक्षक नरेंद्र चांदेवार करीत आहेत.

वाचा: ‘दहीहंड्या फोडून करोना पळत असेल तर ‘टास्क’ फोर्सनंही विचार करावा’

विशेष म्हणजे लोकसहभागातून वनांचे संरक्षण व्हावे या उद्देशाने पाचगाव हे गाव वनक्षेत्र वनहक्क दाव्याअंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गाला इतर पारंपारिक वननिवासी म्हणून वनसमितीला हस्तांतरित करण्यात आले आहे. यावेळी वनविभागाने यास तीव्र विरोधही केला होता. अखेर त्याच वनहक्क गावातील सदस्य वाघाची शिकार करून अवयवाची तस्करी करताना पकडले गेले आहेत. यावरून या वनहक्क समितीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. दरम्यान या प्रकरणातील सहाव्या आरोपीला बुधवारला ताब्यात घेण्यात आले आहे.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: