‘cow should be declared as national animal’ : ‘गायीला राष्ट्रीय पशु घोषित केले पाहिजे’, हायकोर्टाने नोंदवले निरीक्षण


नवी दिल्लीः अलाहाबाद हायकोर्टात एका जामीन याचिकेवर सुनावणी झाली. गायीला राष्ट्रीय पशु घोषित केले पाहिजे. गोरक्षणाला हिंदूंचा मूलभूत अधिकार बनवले पाहिजे. गोहत्येचा आरोपी जावेदची जामीन याचिका फेटाळताना न्यायमूर्ती शेखर यादव यांच्या खंडपीठाने हे निरीक्षण नोंदवलं. ‘गोरक्षा आणि त्याला प्रोत्साहन देणं हे कुठल्याही धर्माशी जुळलेलं नाही. गाय ही भारताची संस्कृती आहे. संस्कृतीचं रक्षण करणं हे देशातील प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. मग तो कुठल्याही धर्माचा असेना’, असं कोर्टाने म्हटलं.

‘जेव्हा एखाद्या देशाची संस्कृती आणि श्रद्धेला ठेच पोहोचते तेव्हा तो देश कमकुवत होतो. आरोपींनी यापूर्वीही गोहत्या केली होती. यामुळे समाजातील सौहार्द बिघडले होते. जर आरोपीला जामीन मिळाला तर तो पुन्हा हा गुन्हा करेल आणि समाजाचं वातावरण बिघडवेल, असं गोहत्येच्या आरोपीची जामीन याचिका फेटाळून न्यायमूर्ती शेखर यादव यांच्या खंडपीठाने म्हटलं.

rahul gandhi : ‘गॅस, डिझेल-पेट्रोलमधून कमवलेले २३ लाख कोटी रुपये कुठे गेले?’

गायीला राष्ट्रीय प्राणी पशु म्हणून घोषित करण्याची सूचना अलाहाबाद हायकोर्टाने केंद्र सरकारला केली आहे. संसदेत विधेयक आणून केंद्र सरकारने गायीला राष्ट्रीय पशुचा दर्जा द्यावा, असंही कोर्टाने म्हटलं आहे. गायीसंदर्भात संसदेने बनवलेल्या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी केली पाहिजे, असं कोर्टाने म्हटलं.

taliban india talk : ‘तालिबान दहशतवादी आहे की नाही, असेल तर मग चर्चा का? सरकार कन्फ्यूज’

‘ ५ मुस्लिम शासकांनीही गोहत्येवर घातली होती बंदी’

फक्त हिंदुंनाच गायीचं महत्त्व माहिती आहे, असं नाही. मुस्लिम शासकांनीही आपल्या कार्यकाळात भारतीय संस्कृतीचं महत्त्व समजलं होतं. ५ मुस्लिम शासकांच्या सत्तेत गोहत्येला बंदील होती. बाबर, हुमायूं आणि अकबराने आपल्या सणांमध्ये गोहत्येवर बंदी घातली होती. म्हैसूरचे नवाब हैदर अली यांनी गोहत्या हा गुन्हा घोषित केला होता, असं हायकोर्टाने म्हटलं.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: