Syed Ali Shah Geelani: हैदरपोरा भागात गिलानी यांच्यावर अंत्यसंस्कार, इंटरनेट सेवा बंद


हायलाइट्स:

  • पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी शोक केला व्यक्त
  • आम्ही जास्त गोष्टींवर सहमत नसलो, तरी… : महबूबा मुफ्ती
  • काश्मीर खोऱ्यात इंटरनेट सेवा बंद

श्रीनगर : जम्मू काश्मीरचे फुटीतरवादी नेते सैय्यद अली शाह गिलानी यांचं बुधवारी रात्री निधन झालं. गुरुवारी सकाळी ५.०० वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडले.

गुरुवारी सकाळी ५.०० वाजता जम्मू काश्मीरच्या हैदरपोरा भागात त्यांना ‘सुपुर्द ए खाक‘ करण्यात आलं. सकाळी १०.०० वाजेपर्यंत गिलानी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याची कुटुंबीयांचं म्हणणं होतं. नातेवाईकांना अंत्यसंस्कारात दाखल होता यावं, यासाठी त्यांना थोडा वेळ हवा होता. परंतु, याची परवानगी दिली गेली नाही.

जम्मू काश्मीरमध्ये गेल्या तीन दशकांहून अधिक काळापर्यंत फुटीरतावादी गटाचं नेतृत्व करणाऱ्या सैय्यद अली शाह गिलानी यांच्या निधनानंतर खोऱ्यातील परिस्थितीवर सुरक्षायंत्रणांची नजर आहे.

कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी काश्मीर खोऱ्यात काही बंदी घालण्यात आल्या आहे. यामध्ये खोऱ्यातील इंटरनेट सेवेचाही समावेश आहे. अफवा रोखण्यासाठी हे पाऊल उचलणं गरजेचं असल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे.

गिलानी यांच्या मृत्यूनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून शोक व्यक्त केलाय.

जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनीही ट्विट करून गिलानी यांच्या मृत्यूमुळे दु:खी असल्याचं म्हटलंय. ‘आम्ही जास्त गोष्टींवर सहमत नसलो, तरी मी त्यांची दृढता आणि विश्वासावर अडीग राहण्यासाठी त्यांचा सन्मान करते’ असं मुफ्ती यांनी म्हटलंय.

पीपल्स कॉन्फरन्सचे अध्यक्ष सज्जाद लोन यांनीही गिलानी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.


९२ व्या वर्षी निधन

मृत्यूसमयी सैय्यद अली शाह गिलानी ९२ वर्षांचे होते. त्यांच्या कुटुंबात दोन मुलं आणि सहा मुली आहेत. १९६८ नंतर आपल्या पहिल्या पत्नीच्या निधनानंतर त्यांनी दुसरा विवाह केला होता. गेल्या २० वर्षांपासून त्यांना मुत्रपिंडाचा त्रास सतावत होता. तसंच वयोमानानुसार आणखीही काही शारीरिक त्रासाला त्यांना सामोरं जावं लागत होतं.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: