Sameer Khan Case: SITने हाती घेतलं मलिक यांच्या जावयाचं प्रकरण; उचललं ‘हे’ मोठं पाऊल


हायलाइट्स:

  • समीर खान ड्रग्ज प्रकरणाचा नव्याने तपास सुरू.
  • एनसीबी एसआयटीने बजावले पहिले समन्स.
  • करण सजनानीला उद्या हजर व्हावे लागणार.

मुंबई: आर्यन खान ड्रग्ज प्रकरणासह एकूण सहा प्रकरणांचा यापुढील तपास एनसीबी एसआयटी करणार आहे. हे अधिकारी मुंबईत दाखल होताच त्यांनी संबंधित प्रकरणांचा तपास एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे व अन्य अधिकाऱ्यांकडून हाती घेतला असून मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्याशी संबंधित प्रकरणात पहिला समन्स आज बजावण्यात आला आहे. ( NCB Sit Summons Karan Sajnani )

वाचा: ‘फडणवीस मुख्यमंत्री असताना तो अंडरवर्ल्ड डॉन…’; मलिक यांचा धमाका

मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी, समीर खान, अभिनेता अरमान कोहली प्रकरण व अन्य तीन प्रकरणांचा तपास करण्यासाठी एनसीबी महासंचालकांनी विशेष तपास पथक नेमलं आहे. एनसीबीचे उपमहासंचालक संजय सिंह हे या पथकाचे प्रमुख आहेत. या पथकाने मुंबईत दाखल होत तपास सुरू केला असून समीर खान प्रकरणात पहिला समन्स बजावण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. समीर खान यांच्याशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेला व्यवसायिक करण सजनानी याला विशेष तपास पथकाने समन्स बजावले आहे. ड्रग्ज प्रकरणात चौकशीसाठी उद्या (बुधवार) तपास पथकासमोर हजर राहावे, असे समन्समध्ये नमूद करण्यात आले आहे. करनानी याला या प्रकरणात आठ महिने तुरुंगात काढावे लागलेले आहेत. एनडीपीएस कोर्टाने सप्टेंबर महिन्यात त्याला जामीन मंजूर केला होता. आता उद्या पुन्हा एकदा एनसीबी चौकशीला सामोरे जावे लागणार असल्याने पुढे काय होणार याकडे संबंधितांचे लक्ष लागले आहे. याच प्रकरणात समीर खान यांनाही समन्स बजावले जाण्याची शक्यता आहे. समीर खान हे मंत्री नवाब मलिक यांचे जावई आहेत.

वाचा:मी उद्या हायड्रोजन बॉम्ब फोडणार!; मलिक यांनी फडणवीसांना ललकारले

दरम्यान, मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आल्यानंतर देशभरात हे प्रकरण गाजलं. त्यात नवाब मलिक यांनी क्रूझवरील छापा बोगस होता, असा दावा करत खळबळ उडवून दिली. त्याचवेळी समीर खानला ज्या प्रकरणात अटक करण्यात आली त्यातही काहीच तथ्य नाही, असा मलिक यांचा दावा आहे. एकूण २६ प्रकरणांवर संशय व्यक्त करत मलिक हे सातत्याने एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप करत आहेत. वानखेडे आणि त्यांची टीम मुंबईत खंडणीवसुलीचे रॅकेट चालवत आहे, असा मलिक यांचा आरोप आहे. हे सर्व आरोप होत असतानाच एनसीबी महासंचालकांनी मुंबई युनिटकडील सहा प्रकरणांचा तपास एसआयटीकडे दिला आहे. ही टीम दिल्लीतील असून नव्याने होणाऱ्या या तपासात नेमक्या कोणत्या बाबी समोर येतात आणि कोणाच्या अडचणी वाढतात, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

वाचा: ‘असे’ आहेत नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध; फडणवीसांनी कागदपत्रेच आणलीSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: