बंगालच्या उपसागरापर्यंत चीनची रेल्वे?; भारतासाठी धोक्याची घंटा!


नेपिडाओ: लडाखमध्ये घुसखोरी करणाऱ्या चीनने भारताला कोंडीत पकडण्यासाठी आणखी एक पाऊल उचलले आहे. चीनने पहिल्यांदाच आता बंगालच्या उपसागरापर्यंत रेल्वे सुरू केली आहे. ही रेल्वे रस्ते मार्गाशी जोडली गेली आहे. या मार्गाच्या माध्यमातून म्यानमारमधून ही रेल्वे मालवाहतुकीसह चीनच्या चेंगदूमधील व्यावसायिक हबकरीत रवाना झाली. या रेल्वे मार्गमुळे चीन आता थेट बंगालच्या उपसागरापर्यंत पोहचला आहे.

चीनच्या सरकारी वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, चीन-म्यानमार न्यू पॅसेजच्या माध्यमातून २७ ऑगस्ट रोजी चेंगदू रेल्वे बंदरापर्यंत आणले गेले आहे. या वाहतूक कॉरिडोरमध्ये समुद्री मार्ग रेल्वे लिंकचाही समावेश आहे. सिंगापूरहून अंदमान समुद्रातून एक मालवाहू जहाज म्यानमारच्या रंगून बंदरात दाखल झाले. या मालवाहू जहाजातील वस्तू चीनमध्ये नेण्यात येणार होत्या. यंगून बंदरात मालवाहू जहाज आल्यानंतर त्यातील वस्तू रस्ते मार्गे म्यानमार-चीन सीमेवरील यूनान प्रांतातील लिकांगपर्यंत पोहचवण्यात आले.

त्यानंतर पुढील मालवाहतूक लिंकाग ते चेंगदूपर्यंत रेल्वेने करण्यात आली. आता, चीन आता सिंगापूरशी म्यानमारच्या माध्यमातून रस्ते मार्गेदेखील जोडला गेला. चीनमधील वृत्तानुसार, हिंदी महासागराशी दक्षिण-पश्चिम चीन प्रांत जोडण्यासाठी हा सगळ्यात सोपा मार्ग आहे. या मार्गाद्वारे व्यापार केल्याने एकाच दिशेच्या प्रवासात २० ते २२ दिवस कमी लागले आहेत. म्यानमारमधील रखाइन राज्यातील क्याउकफ्यूमध्ये आणखी एक बंदर विकसित करण्यासाठी चीन प्रयत्न करत आहे.

चीनचा भारताला इशारा?; हिमालयातील शिखरांवर ताबा मिळवण्याचा केला सराव
चीन या बंदरापर्यंत यूनानपासून थेट रेल्वे मार्ग तयार करणार असल्याची चर्चा आहे. मात्र, म्यानमारमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारामुळे या प्रकल्पाला उशीर होत असल्याचे म्हटले जात आहे. चीन आताही ग्वादर बंदराच्या माध्यमातून हिंदी महासागरात प्रवेश करण्याच्या प्रयत्नात आहे. चीनने चेंगदूसाठी म्यानमारमधून रस्ते मार्गाने व्यापार सुरू केल्यास मालवाहतुकीसाठी ग्वादरच्या तुलनेत कमी खर्च येईल.

तालिबान धक्का! ३५० ठार, ४० हून अधिक ताब्यात; नॉर्दर्न अलायन्सचा दावा
म्यानमारच्या सीमेपासून चीनच्या चेंगदू शहरापर्यंत रेल्वेने पोहचण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी लागतो. म्यानमारमधील एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, पश्चिम चीनला हिंदी महासागराशी जोडण्यासाठी पहिला मार्ग आहे. चीनची रेल्वे सध्या म्यानमारच्या सीमेपर्यंत थांबते. आता चीन या रेल्वे मार्गाला बंदरापर्यंत आणण्याचा प्रयत्न करत आहे.

बंगालच्या उपसागरापर्यंत चीनचा थेट प्रवेश होणे ही भारतासाठी चिंतेची बाब असल्याचे म्हटले जात आहे. चीन ज्या मार्गाने दक्षिण-पूर्व आशियाई देशांसोबत व्यापार करण्याचा प्रयत्न करू इच्छितो, त्या मार्गात अंदमान निकोबार बेट समूहदेखील आहेत. चीनचे अनेक जहाज भविष्यात बंगालच्या उपसागरातून जातील. त्यामुळे भारतीय बेटांवर ते सहजपणे लक्ष ठेवू शकतील.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: