हायलाइट्स:
- आगप्रकरणी अटकेच्या कारवाईवरून वादळ.
- वरिष्ठ अधिकाऱ्यांना अटक न झाल्याने नवा वाद.
- परिचारिका संघटनेने घेतली आक्रमक भूमिका.
वाचा: मी उद्या हायड्रोजन बॉम्ब फोडणार!; मलिक यांनी फडणवीसांना ललकारले
अहमदनगर जिल्हा रुग्णालय येथील अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगप्रकरणी येथील तोफखाना पोलीस ठाण्यात पोलिसांनी स्वत:हून सदोष मनुष्यवधाचे कलम ३०४ अ नुसार गुन्हा दाखल केला आहे. तपासात हाती आलेल्या माहितीनंतर त्यात कलम ३०४ वाढविण्यात आले आहे. याप्रकरणी आज सायंकाळी चौघांना अटक झाली. त्यामध्ये एक वैद्यकीय अधिकारी आणि तीन परिचारिकांचा समावेश आहे. त्यामुळे वरिष्ठांना सोडून कर्मचाऱ्यांना बळीचा बकरा केले जात असल्याचे सांगत परिचारिका संघटना आक्रमक झाली आहे. अटक केलेल्यांना उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्यावेळी त्यांच्यासाठी संघटनेतर्फे वकील नियुक्त करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे.
वाचा: SITने हाती घेतलं मलिक यांच्या जावयाचं प्रकरण; उचललं ‘हे’ मोठं पाऊल
घटनेतील मुख्य सूत्रधाराला पाठिशी घालण्यासाठी परिचारिकांना अटक केल्याचा आरोप करून राज्यव्यापी आंदोलनाची तयारी सुरू झाली आहे. तर नागरिकांमध्येही कर्मचाऱ्यांबद्दल सहानुभूती असून वरिष्ठांना सोडून कर्मचाऱ्यांनाच का अटक झाली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याची दखल राजकीय पातळीवरही घेण्यात आली आहे. एसटीचा संप सुरू असतानाच परिचारिकांच्या आंदोलनाची डोकेदुखी होऊ नये, यासाठी सरकारने काळजीपूर्वक पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पोलिसांचीही कोंडी झाली असून उरलेल्या आरोपींच्या अटकेसाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. यात कोणत्याही क्षणी आणखी काही आरोपींना अटक केले जाण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे पोलिसांना सबुरीने घेण्याच्या सूचनाही मिळत असल्याचे कळते.
वाचा: ‘फडणवीस मुख्यमंत्री असताना तो अंडरवर्ल्ड डॉन…’; मलिक यांचा धमाका