चौथ्या कसोटीआधी इंग्लंड संघात खांदेपालट; अष्टपैलू खेळाडूला बनवलं उपकर्णधार


ओव्हल : इंग्लंडने लीड्स कसोटीत भारताविरुद्ध दणदणीत विजय नोंदवत मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. आता त्यांची नजर ओव्हल कसोटीत विजय मिळवून आघाडी घेण्यावर आहे. गुरुवार (२ सप्टेंबर)पासून सुरू होणाऱ्या या कसोटीसाठी इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमध्येही बदल करण्यात येणार आहेत. कोणत्या खेळाडूला संघात स्थान मिळेल, हे गुरुवारीच स्पष्ट होईल, पण त्याआधी इंग्लंडने संघाच्या नेतृत्वात महत्त्वपूर्ण बदल केला आहे. जो रूटला कर्णधारपदावरून हटवलं गेलं नाही. तो इंग्लंडचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे, पण त्याच्यानंतरच्या म्हणजे उपकर्णधारपदी नव्या चेहऱ्याला संधी देण्यात आली आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने अष्टपैलू खेळाडू मोईन अलीची ओव्हल कसोटीसाठी संघाचा उपकर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे.

वाचा-टी-२० मध्ये न्यूझीलंडचा लाजिरवाणा विक्रम; बांगलादेशच्या गोलंदाजांपुढे फलंदाज भुईसपाट

कसोटी मालिकेच्या सुरुवातीला मोईन अली इंग्लिश संघाचाही भाग नव्हता, पण आता चौथी कसोटी येताच त्याच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यष्टीरक्षक-फलंदाज जोस बटलरच्या जागी मोईनला ही जबाबदारी देण्यात आली आहे. बटलरची पत्नी गरोदर असल्याने त्याने पितृत्व रजा घेतली आहे. त्यामुळे तो ओव्हल कसोटीत खेळणार नाही. दुसऱ्या मुलाचा जन्म होणार असल्यामुळे त्याने रजा मागितली होती, जी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने स्वीकारली आहे. बेन स्टोक्स बाहेर पडल्यानंतर बटलरला संघाचा उपकर्णधार बनवण्यात आलं होतं.

वाचा-चौथ्या कसोटीआधी इंग्लंड संघात खांदेपालट; अष्टपैलू खेळाडूला बनवलं उपकर्णधार

कसोटी मालिकेत फक्त ४ बळी
ऑफ स्पिनर आणि तळातल्या क्रमांकावर महत्त्वाची खेळी खेळणाऱ्या ३४ वर्षीय मोईनने आतापर्यंत इंग्लंडकडून ६३ सामने खेळले आहेत. ज्यात त्याने पाच शतकांच्या मदतीने २८७९ धावा केल्या आहेत. तसेच त्याने १९३ विकेट्सही घेतल्या आहेत. या कसोटी मालिकेत त्याला लॉर्ड्स कसोटीत संघात समाविष्ट करण्यात आले होते. त्यानंतर तो लीड्स कसोटीतही खेळला होता, पण आतापर्यंत तो या मालिकेत फारसा प्रभाव पाडू शकलेला नाही. त्याने ३ डावांमध्ये फक्त ४८ धावा केल्या आहेत, तर ४ विकेट घेतल्या आहेत.

वाचा- ७ सप्टेंबरला होणार टीम इंडियाची घोषणा; पृथ्वी शॉसह ३ खेळाडू राखीव

ओव्हल कसोटीत मोईनची भूमिका महत्त्वाची
ओव्हल कसोटीत मोईनची भूमिका निर्णायक ठरू शकते, कारण खेळपट्टी फिरकीपटूंना उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षित आहे. त्यामुळे तो टीम इंडियासाठी मोठी समस्या बनू शकतो. मोईन व्यतिरिक्त खांद्याच्या दुखापतीतून सावरलेला मार्क वूड संघ निवडीसाठी उपलब्ध असेल. दुसऱ्या कसोटीत क्षेत्ररक्षण करताना तो जखमी झाला होता. तसेच टाचेच्या दुखापतीतून सावरल्यानंतर चौथ्या कसोटीसाठी उपलब्ध असलेला अष्टपैलू खेळाडू ख्रिस वोक्सचे पुनरागमन इंग्लंडसाठी दिलासादायकच आहे.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: