Sameer Wankhe: वानखेडेंच्या आत्याची पोलिसांकडे तक्रार; मलिक यांच्यावर केला ‘हा’ गंभीर आरोप


हायलाइट्स:

  • समीर वानखेडे यांच्या आत्याची पोलिसांकडे धाव.
  • नवाब मलिक यांच्या आरोपांमुळे मन:स्थिती बिघडली.
  • औरंबादच्या मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात केली तक्रार.

औरंगाबाद: राज्याचे अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या जातीबाबत आरोप केले आहेत. समीर वानखेडे यांच्यावर होत असलेल्या सततच्या आरोपांमुळे आमच्या कुटुंबीयांची मानसिक स्थिती बिघडली असल्याचा आरोप करत वानखेडे यांच्या आत्या गुंफाबाई गंगाधर भालेराव (५९, रा. मुकुंदनगर, मुकुंदवाडी, मूळ गाव – वरूड तोफा, ता. रिसोड, जि. वाशिम ) यांनी मलिक यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. ( Sameer Wankhe Vs Nawab Malik Latest News )

वाचा: मी उद्या हायड्रोजन बॉम्ब फोडणार!; मलिक यांनी फडणवीसांना ललकारले

गुंफाबाई भालेराव यांनी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात तक्रार देऊन मंत्री नवाब मलिक यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी केली आहे.
भालेराव यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून नवाब मलिक ‘ एनसीबी ’चे समीर वानखेडे यांच्यावर आरोप करत आहेत. तक्रार अर्जासोबत गुंफाबाई भालेराव यांनी वंशावळ सादर केली आहे. समीर वानखेडे त्यांचे भाचे असून एकाच कुटुंबाचे सदस्य असल्याचे म्हटले आहे. अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना वानखेडे यांनी अटक केली होती. या कारवाईमुळे नवाब मलिक हे समीर वानखेडे व कुटुंबाविरोधात आरोप करत आहेत. आर्यन खान याच्या प्रकरणानंतर मलिक यांनी समीर यांच्या जातीबद्दल पत्रकार परिषदेत दावे केले. वानखेडे यांच्याबाबत खोटा प्रचार केला आहे. सततच्या या आरोपांमुळे आमच्या सर्व कुटुंबियांची मनस्थिती बिघडली असून आम्ही तणावात असल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

वाचा: SITने हाती घेतलं मलिक यांच्या जावयाचं प्रकरण; उचललं ‘हे’ मोठं पाऊल

कायदेशीर बाबी तपासून पुढील कार्यवाही

तक्रारीतील सर्व बाबींचा विचार करून नवाब मलिक यांच्याविरोधात कलम ४, (२), (ब) अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा १९८९ प्रमाणे कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी गुंफाबाई भालेराव यांच्याकडून करण्यात आली आहे. अर्जासोबत जात प्रमाणपत्रही जोडण्यात आले आहे. या प्रकरणात मुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरिक्षक ब्रह्मा गिरी यांना विचारले असता, त्यांनी सध्या ते पोलीस भरती प्रक्रियेत असल्याचे सांगितले. याबाबत आमच्याकडे तक्रार अर्ज प्राप्त झाला आहे. अशा आरोप प्रकरणांत संबंधितांवर केलेल्या आरोपांची शहानिशा करून संपूर्ण कायदेशीर बाबी तपासून पुढील कार्यवाही केली जात असते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

वाचा: ‘फडणवीस मुख्यमंत्री असताना तो अंडरवर्ल्ड डॉन…’; मलिक यांचा धमाकाSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: