हायलाइट्स:
- खासदार संजय राऊत यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची घेतली भेट.
- तत्पूर्वी राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेतली.
- मात्र, या भेटीचे कारण राजकीय नव्हते.
खासदार संजय राऊत यांची कन्या पूर्वशी यांच्या लग्नाची तयारी सुरू असून या विवाह सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठीच संजय राऊत यांनी सपत्निक राजभवन येथे जात राज्यपालांची भेट घेतली. तत्पूर्वी राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना त्याचे निवासस्थान सिल्व्हर ओक येथे जाऊन निमंत्रण दिले.
क्लिक करा आणि वाचा- मुख्यमंत्री ठाकरेंवर लवकरच होणार शस्त्रक्रिया?; होतोय मान, मणक्याचा त्रास
ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे पुत्र मल्हार नार्वेकर यांच्याशी राऊत यांच्या कन्या पूर्वशी यांचा विवाह होत आहे. मल्हार नार्वेकर हे आयटी इंजिनियर आहेत. ते स्वतंत्र व्यवसाय करतात अशी माहिती आहे. पूर्वशी या देखील उच्चशिक्षित असून ‘ठाकरे’ या प्रसिद्ध चित्रपटाच्या त्या निर्मात्याही आहेत.
क्लिक करा आणि वाचा- करोना: राज्यात आज ९८२ नव्या रुग्णांचे निदान, २७ मृत्युमुखी
वानखेडे कुटुंबीयांनीही घेतली राज्यपालांची भेट
दरम्यान, संजय राऊत यांच्या राज्यपालांच्या भेटीपूर्वी समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे, पत्नी क्रांती रेडकर यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. वानखेडे यांच्या कुटुंबियांनी राज्यपाल कोश्यारी यांना निवेदन दिले असल्याचे ज्ञानदेव वानखेडे आणि क्रांती रेडकर यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. सर्व काही ठीक होईल, असे राज्यपाल कोश्यारी यांनी आम्हाला आश्वासन दिल्याचे ज्ञानदेव वानखेडे यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले.
क्लिक करा आणि वाचा- अहमदनगर रुग्णालय आग प्रकरणी मोठी कारवाई, चौघांना अटक