‘या’ शहरात आता वाहनांसाठी वेगमर्यादा प्रतितास ३० किमी !


पॅरिस: प्रदूषण कमी करण्यासाठी आणि अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी पॅरिसमध्ये एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पॅरिसमध्ये आता वाहनांना वेग मर्यादा घालण्यात आली आहे. पॅरिसमध्ये आता वाहनांची वेगमर्यादा प्रतितास ३० किमी इतकी असणार आहे. याचाच अर्थ वेगाने वाहन चालवण्यास परवानगी नसणार. सोमवारपासून हा नियम लागू करण्यात आला आहे.

हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याशिवाय या निर्णयामुळे अपघातही कमी होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, ६० टक्के लोकांनी या नव्या निर्णयाला आपला पाठिंबा दिला आहे. तर, तज्ज्ञ आणि व्यावसायिकांनी वेगवेगळी मते व्यक्त केली आहेत.

पृथ्वीची विनाशाकडे वाटचाल; मानवतेसाठी धोक्याचा इशारा: IPCC
पॅरिसमध्ये विविध मार्गांवर याआधीच वेगवेगळी वेगमर्यादा घालून देण्यात आली आहे. आता मात्र, महापौरांनी संपूर्ण शहरात ३० किमी प्रति तास ही वेग मर्यादा सगळ्या शहरात लागू करण्यात येणार असल्याचे जाहीर केले.

शहरातील रस्ते आता आणखी रुंद करण्यात येणार असून झाडे लावण्यात येणार आहे. त्याशिवाय सायकलसाठी विशेष लेन तयार करण्यात येणार आहे. जेणेकरून लोकांना सायकलच्या वापरासाठी प्रोत्साहित करता येऊ शकेल. पॅरिस शहराच्या महापौरांनी सांगितले की, येत्या उन्हाळ्याच्या सुट्टीपर्यंत लोकांना सायकल वापराची सवय लागली पाहिजे यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

हवामान बदलाचा परिणाम; अडीच कोटी लोकसंख्येचे ‘हे’ शहर नष्ट होणार?
फक्त पॅरिसमध्येच वेगमर्यादा लागू करण्यात आली नाही. स्पेनमधील बिलबाओ, बेल्जिअममधील ब्रुसेल्ससह युरोपमधील अनेक शहरांमध्ये या प्रकारची वेग मर्यादा लागू करण्यात आली आहे. हवामान बदल, प्रदूषणामुळे वाढलेला धोका आदी बाबी लक्षात घेऊन अशा प्रकारचे निर्णय घेतले जात आहेत.

करोना विषाणू जैविक शस्त्र?; अमेरिकन गुप्तचर संस्थांनी म्हटले…
पॅरिस शहरातील व्यावसायिकांनी या नियमांचा विरोध केला आहे. अशा प्रकारची वेग मर्यादा फूड डिलिव्हरी अथवा अन्य कामांसाठी मोठा अडथळा ठरणार आहे. लोकांना एका वेळेतच फूड डिलिव्हरी हवी असते. त्यामुळे प्रतितास ३० किमी या वेगमर्यादेमुळे नुकसान होण्याची भीती आहे.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: