‘सकाळी सकाळी त्यांच्याशी बोलू नये’; सौरव गांगुलीच्या टोमण्याला रवी शास्त्रींचं उत्तर


नवी दिल्ली : क्रिकेट विश्वातील भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यातील संबंधांच्या बातम्या अनेकवेळा चर्चेत असतात. २०१६ मध्ये रवी शास्त्री संघाचे प्रशिक्षक बनू शकले नाहीत, याचा संबंध सौरभ गांगुलीशी जोडला गेला.

वाचा- ७ सप्टेंबरला होणार टीम इंडियाची घोषणा; पृथ्वी शॉसह ३ खेळाडू राखीव

त्यानंतर, आयपीएलच्या यशस्वी आयोजनाबद्दल शास्त्रींनी गांगुलीचे अभिनंदन केले नाही, हे देखील दोघांच्या नात्यातील संबंध ताणले गेल्याचे उदाहरण होते. भारताच्या या माजी दोन्ही खेळाडूंनी एकमेकांवर निशाणा साधण्याची एकही संधी सोडली नाही. टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत रवी शास्त्री आणि सौरभ गांगुली यांच्यातील दुराव्याची झलक पुन्हा एकदा दिसून आली.

वाचा- विराटच्या हातात आहे भारतीय संघाचा विजय, जाणून घ्या सूत्र

उशिरा याल तर कुणासाठीही बस थांबणार नाही
रवी शास्त्रींना प्रश्न विचारण्यात आला की, एकदा तुम्ही लिहिले होते की, सौरव गांगुली उशिरा आल्याने तुम्ही त्याला टीम बसमध्ये चढू दिलं नव्हतं. याबाबत जेव्हा गांगुलीला विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी सांगितले होते की, सकाळी सकाळी रवी शास्त्रींची मुलाखत घेऊ नये. तुमच्यात आणि गांगुलीमध्ये काही वाद झाला आहे का? यावर रवी शास्त्री म्हणाले की, ‘जर कुणी उशिरा आलं, तर त्याच्यासाठी बस थांबणार नाही. मग ती व्यक्ती कुणीही असो. हेच त्या दिवशी सौरभसोबत घडले होते.

वाचा- टी-२० मध्ये न्यूझीलंडचा लाजिरवाणा विक्रम; बांगलादेशच्या गोलंदाजांपुढे फलंदाज भुईसपाट

शास्त्रींचे गांगुलीवर आरोप
२०१६ मध्ये जेव्हा क्रिकेट सल्लागार समितीने अनिल कुंबळेची भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली, त्यावेळी दोघांच्या नात्यातील कटुताही समोर आली होती. गांगुली व्यतिरिक्त, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि सचिन तेंडुलकर यांचा या समितीमध्ये समावेश होता. प्रशिक्षक बनू न शकल्याने शास्त्रींनी सौरव गांगुलीवर आरोप केले होते. प्रत्युत्तरादाखल गांगुली म्हणाला होता की, कोणी एक सदस्य हा निर्णय घेऊ शकत नाही.

वाचा- चौथ्या कसोटीआधी इंग्लंड संघात खांदेपालट; अष्टपैलू खेळाडूला बनवलं उपकर्णधार

गांगुलीचं नाही केलं अभिनंदन
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये कोरोना असताना बीसीसीआयने आयपीएलचे यशस्वी आयोजन केले होते. यासंदर्भात टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी एक ट्विट केलं होतं. विशेष गोष्ट म्हणजे शास्त्रींनी बीसीसीआयचे अभिनंदन केलं होतं, पण त्यात सौरव गांगुलीचं नाव लिहलं नव्हतं. आयपीएलच्या १३ व्या हंगामाच्या अंतिम फेरीत मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करत पाचव्यांदा ट्रॉफी जिंकली होती.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: