बिबट्यापासून परिसरातील शेतकरी कुटुंबात घबराटीचे वातावरण निर्माण – स्वाभिमानी शेतकरी संघटना

बिबट्याला तात्काळ पकडावे आणि बिबट्या असलेल्या परिसरातील शेती पंपाचा वीज पुरवठा दिवसा करावा

पंढरपूर /संभाजी वाघुले, 09/11/2021- मागील दोन वर्षांपासून वाखरी,उपरी,भंडीशेगाव परिसरात बिबट्याने दहशत निर्माण केली आहे, अनेक वेळा शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरे या बिबट्याच्या हल्ल्यात दगावली आहेत परंतु वनविभागाने कोणतीही ठोस कारवाई न करता फक्त उडवा उडवीची उत्तरे देऊन या परिसरात बिबट्या नाही असे सांगितले होते.

काल एका शेतकऱ्याने सदर बिबट्याचा व्हिडिओ काढुन प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे, तरीही प्रशासकीय पातळीवर हालचाल झालेली नाही. सदर बिबट्यापासून परिसरातील शेतकरी कुटुंबात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

  शेतकरी दिवस रात्र शेतात काम करत असतो. शेतकरी कुटुंबातील मुले शाळेला या परिसरातून जात येत असतात त्यामुळे आत्तापर्यंत जनावरांवर हल्ला करणारा बिबट्या माणसांवरही हल्ला करु शकतो.त्यामुळे कोणतीही जीवितहानी होण्या आधी प्रशासनाने तातडीने सुत्रे हालवून बिबट्या जेरबंद करावे तसेच बिबट्या असलेल्या परिसरा तील शेती पंपाचा वीजपुरवठा दिवसा करावा अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करेल होणाऱ्या नुकसानीस शासन व प्रशासन जबाबदार असेल असे निवेदन पंढरपूर विभागाचे प्रांताधिकारी गजानन गुरव यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने देण्यात आले.

 यावेळी स्वाभिमानीचे सचिन पाटील,उद्धव बागल, शहाजहान शेख,स्वागत फाटे, बाहुबली सावळे, सचिन आटकळे,नवनाथ मोहिते,विजय जाधव,योगेश शिंदे,दत्ता कौलगे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: