लखनऊःलखीमपूर खिरी हिंसाचार प्रकरणी मोठा खुलासा झाला आहे. लखीमपूर हिंसाचारावेळी गोळीबार झाला होता. तीन हत्यारांना गोळीबार झाल्याचे पुरावे मिळाले आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा आशिष मिश्रा याची बंदुकही तपासणी पाठवण्यात आली होती. आशिष मिश्राच्या बंदुकीतून गोळीबार झाल्याचं फॉरेन्सिक तपासात समोर आलं आहे, असा दावा मीडिया रिपोर्ट्समधून करण्यात आला आहे.
लखीमपूर खिरी प्रकरणातील दुसरा आरोपी अंकीत दास याच्या पिस्तुलाचीह तपासणी केली गेली. तसंच अंकीतचा याचा गनर लतीफ याच्या रिपीटर गनचीही तपासणी झाली. घटनास्थळावरून पळ काढताना परवाना असलेल्या शस्त्रांद्वारे गोळीबार झाला होता. पण पोस्टमार्ट रिपोर्टमध्ये कुणालाही गोळी लागल्याचं समोर आलेलं नाही. पण तपासात पोलिसांना गाड्यांवर गोळ्यांचे निशाण आढळून आले. याच आधारावर रायफल जप्त करण्यात आल्या होत्या.
खळबळ! गावातील विहिरीतील ‘ते’ दृश्य बघून ग्रामस्थांना बसला मोठा धक्का
लखीमपूर खिरी जिल्ह्यातील तिकुनियामध्ये ३ ऑक्टोबरला एका कारने शेतकऱ्यांना चिरडले. यात ४ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. यानंतर हिंसाचार उसळला. एकूण ८ जणांचा यात मृत्यू झाला. या प्रकरणी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा हा मुख्य आरोपी आहे. या प्रकरणी सुप्रीम कोर्टातही सुनावणी सुरू आहे. तर विरोधी पक्षांनी अजय मिश्रा यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.
२५ हजार बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार, अयोध्येच्या ‘शरीफ चाचां’नी स्वीकारला ‘पद्मश्री’
Source link
Like this:
Like Loading...