coronavirus latest updates करोना: राज्यात आज ९८२ नव्या रुग्णांचे निदान, २७ मृत्युमुखी


हायलाइट्स:

  • गेल्या २४ तासांत राज्यात ९८२ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे.
  • गेल्या २४ तासांमध्ये एकूण १ हजार २९३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
  • आज राज्यात एकूण २७ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मुंबई: राज्यात आज करोनाच्या (Coronavirus) दैनंदिन रुग्णसंख्येत तुलनने किंचित वाढ झाली असून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही थोडी कमी झाली आहे. तसेच मृत्यूसंख्याही वाढली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात राज्यात ९८२ इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. काल ही संख्या ७५१ इतकी होती. तर आज दिवसभरात एकूण १ हजार २९३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. काल ही संख्या १ हजार ५५५ इतकी होती. तर, आजही २७ रुग्णांचा मृत्यू झाला. काल ही संख्या १५ इतकी होती. (maharashtra registered 982 new cases in a day with 1293 patients recovered and 27 deaths today)

आज राज्यात झालेल्या २७ रुग्णांच्या मृत्यूंनंतर राज्याच्या मृत्यूदर २.१२ टक्क्यांवरच स्थिर आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६४ लाख ६१ हजार ९५६ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.६२ टक्के इतके आहे.

क्लिक करा आणि वाचा- अहमदनगर रुग्णालय आग प्रकरणी मोठी कारवाई, चौघांना अटक

मुंबईत सर्वाधिक रुग्णवाढ

आज राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या १३ हजार ३११ इतकी आहे. काल ही संख्या १३ हजार ६४९ या बरोबरच राज्यातील दैनंदिन रुग्णवाढीचा विचार करता सर्वात जास्त रुग्णवाढ आज मुंबई महानगरपालिका क्षेत्रात झाली आहे. मुंबईत एकूण २७४ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. तर त्या खालोखाल पुणे जिल्ह्यात आज ९३ नवे रुग्ण वाढले आहेत. तर अहमदनगर जिल्ह्यात ही संख्या ८२ इतकी आहे.

क्लिक करा आणि वाचा- धक्कादायक! जळगाव जिल्ह्यातील दोघा शेतकऱ्यांची आत्महत्या

त्या खालोखाल ठाणे जिल्ह्यात एकूण २४ नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. रायगडमध्ये ही संख्या ११ इतकी आहे.

नाशिकमध्ये २१, सोलापुरात २६, साताऱ्यात ही संख्या ३६, कोल्हापुरात २, सांगलीत ८ तर रत्नागिरीत ३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

तसेच औरंगाबादमध्ये आज ३ नवे रुग्ण आढळले असून जालना ७ रुग्ण आढळले आहेत.

तर, उस्मानाबादमध्ये २, बीडमध्ये १० रुग्ण आढळले आहेत. नागपूर मनपाक्षेत्रात ३ रुग्ण आढळले आहेत.

क्लिक करा आणि वाचा- जळगावात नीलेश राणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल; ‘हे’ कारण

१,३३,२६२ व्यक्ती होम क्वारंटाइन

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ६ कोटी ३३ लाख ९९ हजार ३५५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६ लाख १९ हजार ३२९ (१०.४४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख ३३ हजार २६२ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, ८६७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: