ए.एम.स्पोर्ट्स डोणज आयोजित खुला गट खो खो स्पर्धेत वेळापूर,सोलापूर,मंद्रूप संघास विजेतेपद

ए.एम.स्पोर्ट्स डोणज ता.मंगळवेढा आयोजित खुला गट खो खो स्पर्धेत वेळापूर,सोलापूर,मंद्रूप संघास विजेतेपद

मंगळवेढा /प्रतिनिधी :- कै.अंबीर मुलाणी यांच्या सातव्या पुण्यतिथीनिमित्त दि.०६.११.२०२१ रोजी जि.प.प्रा.शाळा डोणज येथे पार पडलेल्या भव्य खुला गट खो खो स्पर्धेत ए.एन वेळापूर संघास प्रथम क्रमांक,उत्कर्ष क्रीडा मंडळ सोलापूर संघास व्दितीय क्रमांक,दिनबंधू मंद्रूप संघास तृतीय क्रमांक तर न्यू गोल्डन क्लब मंद्रूप संघाने चतुर्थ क्रमांक पटकावला.

या स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठीचा सामना ए.एन वेळापूर विरुद्ध उत्कर्ष सोलापूर असा चुरशीचा झाला . या सामन्यात वेळापूरचा खेळाडू रामजी कशाप्पा व राहुल सावंत यांनी उकृष्ट संरक्षण करून संघासाठी मोठे योगदान देऊन विजयश्री खेचून आणली तर सोलापूर संघाकडून निखिल कापुरे यांनी चांगला आक्रमणाच्या खेळाचे प्रदर्शन दाखवून उपस्थितांची मने जिंकून व्दितीय क्रमांकाचे परितोषिक पटकावले.

    या स्पर्धेकरीता सोलापूर अँम्युचर खो खो असोसिएशनचे सचिव सुनील चव्हाण,उपाध्यक्ष रामभाऊ दत्तू, येताळा भगत सर, अजित शिंदे सर, रविंद्र माशाळकर, कृष्णा कोळी, बबलू शेख यांचे समवेत युवक नेते सिद्धेश्वर आवताडे, मा.चेअरमन दामाजी शुगरचे शशिकांत बुगडे व अशोक केदार संचालक दामाजी शुगर,सदाशिव कोळी उपसरपंच ,राजेंद्र लिगाडे गुरुजी,अशोक कोळी गुरुजी,राजेंद्र केदार गुरुजी,रमेश केदार माजी.ग्रामपंचायत सदस्य ,श्रीमंत केदार ग्रामपंचायत सदस्य यांनी उपस्थिती दर्शवली.

    या सर्व विजेते संघाच्या खेळाडूंचे एएम स्पोर्ट्सच्यावतीने अभिनंदन करण्यात आले. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ए एम स्पोर्ट्सचे मार्गदर्शक व युटोपियन शुगर्सचे स्टोअर अकौंटंट सुनिल पुजारी, फायनान्स अकौंटंट आमसिद्ध कोरे ,संयोजक आणप्पा बिराजदार,अनिल लिगाडे, रोहित लिगाडे,विठ्ठल बगले सर,देविदास कोळी, राहुल भोसले,अप्पू बाळगे,प्रमोद आनंदपुरे यांच्या सह डोणज ग्रामस्थांनी प्रयत्न केले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: