नवी दिल्लीः अरुणाचल प्रदेश सेक्टरमधील प्रत्यक्ष ताबा रेषेजवळ (LAC) चीनने गाव वसवल्याचा दावा अमेरिकेच्या पेंटागॉनने जाहीर केलेल्या एका रिपोर्टमधून करण्यात आला आहे. चीनचा ताबा असलेल्या भागात हे गाव वसवण्यात आल्याची माहिती सुरक्षा यंत्रणेच्या सूत्रांनी दिली. अरुणाचल प्रदेश सेक्टरमधील वादग्रस्त भागात चीनने मोठे गाव वसवले आहे, असं अमेरिकेच्या संरक्षण विभागाने म्हणजेच पेंटागॉनने सैन्य आणि सुरक्षा घडामोडीवरील वार्षिक अहवालात म्हटले आहे.
rafale deal : राफेल सौद्यावरून झडल्या आरोपांच्या फैरी! ‘INC म्हणजे I Need Commission’,
काय आहे लोंगजू घटना?
अरुणाचल प्रदेशच्या सीमावर्ती भागातील एका ऑपरेशनमध्ये आसाम रायफल्सच्या चौकीवर हल्ला केल्यानंतर १९५९ मध्ये पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) ताब्यात घेतलेल्या भागात हे गाव चीनने वसवले आहे. ही घटना लोंगजू म्हणून ओळखली जाते, असं सूत्रांनी सांगितलं.
kashmir : दहशतवाद्यांनी केली सेल्समनची हत्या, २४ तासांतील दुसरा हल्ला