RCBने २०२२च्या हंगामासाठी घेतला मोठा निर्णय, या भारतीय खेळाडूची केली नियुक्ती


बेंगळुरू: आयपीएलच्या १५व्या हंगामाची तयारी बीसीसीआयकडून सुरू झाली आहे. २०२२ साली होणाऱ्या हंगामात दोन नव्या संघाचा समावेश झाला आहे. यामुळे स्पर्धेतील संघांची संख्या ८ वरून १० वर पोहोचली आहे. आयपीएलमध्ये गेल्या हंगामापर्यंत विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाने एक मोठा निर्णय घेतला आहे.

वाचा- जाता जाता रवी शास्त्रींनी पराभवाचे खापर यांच्या डोक्यावर फोडले

आयपीएलच्या पुढील हंगामापासून आरसीबी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी संजय बांगर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बांगर यांना फ्रेब्रुवारी महिन्यात फलंदाजीचा सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले होते. आता त्यांची नियुक्ती मुख्य प्रशिक्षक म्हणून करण्यात आली आहे. बांगर माइक हेसन यांची जागा घेतील. हेसन यांच्याकडे क्रिकेट संचालक निर्देशक अशी जबाबदारी देण्यात आली आहे.

वाचा- ही आहेत ती दोन नावे ज्यांच्यामुळे भारताला ICCचे विजेतेपद मिळवता आले नाही

ऑस्ट्रेलियाचे सायमन कॅटीच यांनी वैयक्तीक कारणामुळे आरसीबीच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे आयपीएल २०२१च्या दुसऱ्या सत्रात हेसन यांच्याकडे मुख्य प्रशिक्षक पदाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली होती. आरसीबीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये हेसन यांनी सांगितले की, संजय बांगर पुढील दोन वर्षासाठी आरसीबीचे मुख्य कोच असतील. बांगर हे फलंदाजीचे कोच म्हणून ओळखले जातात. पण त्याची क्षमता त्या पेक्षा अधिक आहे. त्याच्याकडे प्रशिक्षणाचा मोठा अनुभव आहे. ते २०१४ ते २०१९ पर्यंत भारतीय क्रिकेट संघाचे फलंदाजीचे कोच होते.

वाचा- आळशी म्हणणाऱ्यांना रोहित शर्माने दिले सडेतोड उत्तर; टी-२०मध्ये केला हा विक्रम

वाचा- टी-२० क्रिकेटमध्ये नवा वर्ल्ड रेकॉर्ड; या खेळाडूने सलग ४ षटकात केली ऐतिहासिक

मी संघातील खुप चांगल्या खेळाडूंसोबत काम केले आहे. संघाला पुढील स्तरावर घेऊन जाण्यासाठी आता आणखी वाट पाहावी लागणार नाही, असे बांगर यांनी नियुक्ती झाल्यानंतर सांगितले. बांगर यांनी २००१ ते २०४ या काळात भारताकडून १२ कसोटी आणि १५ वनडे सामने खेळले आहेत.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: