भारतासाठी वर्ल्डकप संपला; आता खेळाडू काय करणार जाणून अपडेट


जयपूर: भारतीय क्रिकेट संघ आयसीसी टी-२० वर्ल्डकपमधून बाहेर पडला आहे. युएईमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेत भारताला ग्रुप बी मध्ये तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. भारताने पहिल्या दोन लढती पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध गमावल्या त्यानंतर ३ सामन्यात विजय मिळवला पण तो सेमीफायनलमध्ये पोहोण्यासाठी पुरेसा ठरला नाही.

वाचा- ही आहेत ती दोन नावे ज्यांच्यामुळे भारताला ICCचे विजेतेपद मिळवता आले नाही

वर्ल्डकपमधील भारताच्या लढती संपल्यानंतर आता खेळाडू मायदेशात परतणार आहेत. भारतीय खेळाडू गेल्या काही महिन्यांपासून परदेशात आहेत. इंग्लंड दौऱ्यावर गेलेले भारतीय खेळाडू त्यानंतर युएईमध्ये प्रथम आयपीएल आणि नंतर वर्ल्डकप खेळत होते. आता दुबईमधून ते थेट जयपुरमध्ये येणार आहेत. भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सवाई मानसिंह स्टेडियमवर येत्या १७ नोव्हेंबर रोजी टी-२० मॅच खेळवली जाणार आहे. या लढतीसाठी भारतीय संघ १० नोव्हेंबर रोजी जयपूरला पोहोचेल. भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध टी-२० मालिका खेळणार आहे. करोना व्हायरसची साथ आल्यापासून देशात प्रथमच प्रेक्षकांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय सामना होणार आहे.

वाचा- आळशी म्हणणाऱ्यांना रोहित शर्माने दिले सडेतोड उत्तर; टी-२०मध्ये केला हा विक्रम

भारतीय संघ उद्या १० नोव्हेंबर रोजी जयपूरमध्ये दाखल होईल. येथे त्यांना ३ दिवस हॉटेलमध्ये क्वारंटाइन रहावे लागणार आहे. त्यानंतर ते १४ ते १६ नोव्हेंबर या काळात मानसिंह स्टेडियमवर सराव करणार आहेत. न्यूझीलंडचा क्रिकेट संघ वर्ल्डकप झाल्यानंतर जयपूरमध्ये दाखल होणार आहे. त्यांना देखील क्वारंटाइनचा कालावधी पूर्ण केल्यानंतर सराव करता येईल. दोन्ही संघात ३ सामन्यांची मालिका होणार आहे. दुसरी मॅच १८ नोव्हेंबर रोजी रांचीत होणार आहे.

वाचा- टी-२० क्रिकेटमध्ये नवा वर्ल्ड रेकॉर्ड; या खेळाडूने सलग ४ षटकात केली ऐतिहासिक

१०० टक्के क्षमतेने स्टेडियम भरणार

राजस्थान सरकारने करोना संदर्भात नवे आदेश जारी केले आहेत. यात क्रीडा स्पर्धा आयोजित करताना १०० टक्के क्षमतेने प्रेक्षकांना मैदानात प्रवेश देता येईल. राजस्थान क्रिकेट असोसिएशने स्टेडियमवर तयारी सुरू केली आहे. ज्या प्रेक्षकांनी लस घेतली आहे त्यांनाच सामना पाहण्याची परवानगी दिली जाणार आहे. राज्य सरकारच्या परवानगीनंतर तिकीट विक्री सुरू केली जाणार आहे, असे असोसिएशनचे सचिव महेंद्र शर्मा यांनी सांगितले.

वाचा-जाता जाता रवी शास्त्रींनी पराभवाचे खापर यांच्या डोक्यावर फोडले

न्यूझीलंडविरुद्ध नवा कोच आणि कर्णधार

बीसीसीआयने संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी राहुल द्रविडची नियुक्ती केली आहे. कर्णधारपदावर विराटच्या जागी रोहित शर्माच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे या मालिकेत नव्या कर्णधार आणि प्रशिक्षकाची पहिली परीक्षा असेल. सवाई मानसिंह स्टेडियमवर ८ वर्षानंतर प्रथमच क्रिकेट सामना होत आहे. या मैदानावर १६ ऑक्टोबर २०१३ रोजी अखेरची आंतरराष्ट्रीय मॅच झाली होती. तेव्हा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने ३५९ धावा केल्या होत्या. भारताने विजयाचे लक्ष्य ४३.३ षटकात पार केले होते. हे मैदान फलंदाजीसाठी उपयुक्त मानले जाते.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: