सनातन संस्थेचाही अंडरवर्ल्डशी संबंध जोडायचा का?; नवाब मलिक यांचा फडणवीसांना रोकडा सवाल


हायलाइट्स:

  • नवाब मलिक विरुद्ध देवेंद्र फडणवीस सामना रंगला
  • फडणवीसांच्या आरोपांना मलिक यांनी दिलं सडेतोड उत्तर
  • सनातन संस्थेचाही अंडरवर्ल्डशी संंबंध जोडायचा का? – मलिक यांचा सवाल

मुंबई: जमिनींच्या खरेदी व्यवहारांचे दाखले देत नवाब मलिक (Nawab Malik) व त्यांच्या कुटुंबीयांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे आरोप करणारे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना मलिक यांनी आज सडेतोड उत्तर दिलं. ‘फडणवीस हे बॉम्ब फोडण्याची भाषा करून खोट्या आरोपांचे अवडंबर माजवत आहेत. त्यांच्या म्हणण्याप्रमाणं असा कोणाचाही कोणाशी संबंध जोडायचा झाला तर सनातन संस्थेचा अंडरवर्ल्डशी संबंध आहे असंही म्हणावं लागेल,’ असं मलिक यांनी सुनावलं.

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी शाह वली खान व सलीम पटेल यांच्याकडून मलिक यांच्या कुटुंबीयांच्या कंपनीनं मुंबईत कवडीमोल भावात जमिनी खरेदी केल्या आहेत. वली खान हा बॉम्बस्फोटातील कटात सहभागी होता. त्यानं बॉम्बस्फोटांच्या ठिकाणांची रेकी केली होती. आरडीएक्सही गाड्यांमध्ये ठेवलं होतं. तर, सलीम पटेल हा दाऊदची बहीण हसीना पारकर हिचा ड्रायव्हर व बॉडीगार्ड आहे. तो दाऊदसाठी जमिनींवर कब्जा करण्याचं काम करायचा. मुंबईचे गुन्हेगार असलेल्या या लोकांकडून मलिक यांनी जमीन का खरेदी केली? हे दोघे दोषी ठरल्यानंतर त्यांच्या जमिनींवर जप्ती येऊ नये म्हणून मलिक यांनी हे सगळं केलं का?,’ असा प्रश्न फडणवीस यांनी केला होता.

वाचा: ‘असे’ आहेत नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध; फडणवीसांचा दावा

मलिक यांनी तात्काळ पत्रकार परिषद घेत फडणवीस यांचे आरोप फेटाळून लावले. ‘माझ्या कुटुंबीयांनी जी जमीन घेतली, तिथं आम्ही आधीपासून भाडेकरू होतो. जेव्हा जमीन खरेदी करायचं ठरलं, तेव्हा त्यात शाह वली खान आणि सलीम पटेल हे हकदार असल्याचं आम्हाला समजलं. तो हक्क सोडवून घेण्यासाठी आम्हाला त्यांना काही रक्कम द्यावी लागली. तो व्यवहार उघड आहे. त्याच्याशी अंडरवर्ल्डचा काही संबंध नाही. शाह वली खान याचं घर आजही त्याच गोवावाला कम्पाउंडमध्ये आहे आणि सलीम पटेल हा कुठले उद्योग करायचा याची कुठलीही माहिती आम्हाला नव्हती. पॉवर ऑफ अटर्नी त्याच्या नावे असल्यानं त्या व्यवहाराशी त्याचा संबंध आला,’ असं मलिक म्हणाले.
‘मी कुठलीही जमीन कोणाच्याही दबावाखाली किंवा कोणावर दबाव आणून घेतलेली नाही. हसीना पारकरलाही मी ओळखत नाही. असा कोणाचाही कुणाशी संबंध जोडायचा झाला तर दाऊद कासकरचं कोकणातलं घर सनातन संस्थेनं घेतलंय. मग सनातनचा दाऊदशी किंवा अंडरवर्ल्डशी संबंध आहे असं म्हणायचं का?,’ असा खडा सवाल नवाब मलिक यांनी फडणवीसांना केला.

वाचा: शाह वली खानचं घर आजही गोवावाला कम्पाउंडमध्ये आहे – नवाब मलिकSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: