आळशी म्हणणाऱ्यांना रोहित शर्माने दिले सडेतोड उत्तर; टी-२०मध्ये केला हा विक्रम


दुबई: भारतीय क्रिकेट संघाने आयसीसी टी-२० वर्ल्डकपमध्ये अखेरच्या सामन्यात विजय मिळवला. भारताचे स्पर्धेतील आव्हान याआधीच संपुष्टात आल्याने ही लढत फक्त औपचारिक होती. सोमवारी नामिबिया विरुद्ध झालेल्या लढती भारताने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नामिबियाला १३२ धावांवर रोखले. त्यानंतर सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी झळकावलेल्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने १५.१ षटकात १ विकेटच्या बदल्यात विजय मिळवला.

वाचा- टी-२० क्रिकेटमध्ये नवा वर्ल्ड रेकॉर्ड; या खेळाडूने सलग ४ षटकात केली ऐतिहासिक कामगिरी

या सामन्यात रोहितने ३७ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांसह ५६ धावा केल्या. याआधी त्याने अफगाणिस्तानविरुद्ध अर्धशतक केले होते. नामिबियाविरुद्धच्या सामन्यात रोहितने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये ३ हजार धावांचा टप्पा पार केला. अशी कामगिरी करणारा तो जगातील फक्त तिसरा फलंदाज आहे. या यादीत अव्वल स्थानी विराट कोहली असून त्याने ३ हजार २२७ धावा तर न्यूझीलंडचा मार्टिन गप्टिल ३ हजार ११५ धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. फलंदाजीत ३ हजारचा टप्पा पार करण्याआधी रोहितने फिल्डिंगमध्ये एक नवा विक्रम केला.

वाचा- आजपासून टीम इंडियाची नवी सुरूवात; नव्या कर्णधाराचे आणि टीमचे

नामिबियाची फलंदाजी सुरू असताना रोहितने शानदार फिल्डिंग केली आणि आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये नवा विक्रम केला. रोहितने या सामन्यात ३ कॅच पकडले आणि या प्रकारात भारताकडून सर्वाधिक कॅच पकडण्याचा विक्रम स्वत:च्या नावावर केला. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये रोहितने घेतलेल्या कॅचची संख्या ४४ इतकी असते. या यादीत ४२ कॅचसह सुरेश रैना दुसऱ्या स्थानावर आहे. तर विराट कोहलीने ९४ सामन्यात ४२ कॅचसह तिसऱ्या स्थानावर आहे. हार्दिकने ५४ सामन्यात ३४ तर जडेजाने ५५ सामन्यात २२ कॅच घेतले आहेत.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: