लसीकरण पूर्ण झालेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना अमेरिकेची दारे खुली


हायलाइट्स:

  • लढा करोनाशी
  • लसीकरण पूर्ण झालेल्या प्रवाशांचा प्रवास सुरू
  • ४८ तास आधी केलेली करोना चाचणी निगेटिव्ह आवश्यक


वृत्तसंस्था, नवी दिल्ली : अमेरिकेने आंतरराष्ट्रीय प्रवाशांना देशाची दारे खुली केली आहेत. भारतासह इतर देशांतील ज्या प्रवाशांचे पूर्ण लसीकरण झाले आहे, अशा देशांतील नागरिक आता अमेरिकेत जाऊ शकणार आहेत. नवी दिल्ली येथून सोमवारी अमेरिकेकडे विमानाने उड्डाण केले. करोनाच्या उद्रेकानंतर गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी अमेरिकेने बंदी घातली होती. सॅन फ्रान्सिस्को येथे राहणाऱ्या अदित्य गर्ग यांनी अमेरिकेला उड्डाण केले. दीर्घ कालावधीनंतर अमेरिकेला जाण्यासाठी निघालेल्या गर्ग यांच्यासह अनेकांनी आपापल्या कामाच्या ठिकाणी जाता येत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

अमेरिकेला जाण्यासाठी पूर्ण लसीकरण आवश्यक असून, प्रवासाला निघण्यापूर्वी ४८ तास आधी केलेली करोना प्रतिबंधक चाचणी निगेटिव्ह येणे आवश्यक आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून अमेरिकेला न जाऊ शकलेले अनेक जण अमेरिकेला जाण्यासाठी उत्सुक असून, सोमवारनंतर ठरावीक कालावधीमध्ये तिथे काम करणारे भारतीय, त्यांचे नातेवाइक अमेरिकेला जाऊ शकणार आहेत. पूर्ण लसीकरण झाल्यामुळे करोनाचा धोका तुलनेने कमी असल्याचे मत काही प्रवाशांनी व्यक्त केले. भारताबाहेर निघालेल्यांना निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कुटुंबीयांची दिल्ली विमानतळावर गर्दी होती. गेल्या महिन्यात अमेरिकेने आंतरराष्ट्रीय प्रवासावरचे निर्बंध उठवित असल्याचे ‘व्हाइट हाऊस’ने जाहीर केले होते. करोना साथरोगामुळे बिकट झालेली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्रवासावरील निर्बंध उठवित असल्याचे अमेरिकेने म्हटले होते.

जर्मनीत वाढली रुग्णसंख्या

जर्मनीमध्ये करोनाचे प्रमाण पुन्हा वाढत असून, लसीकरण न झालेल्या नागरिकांना करोनाची लागण होत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या २४ तासांमध्ये १५,५१३ नागरिकांना करोनाची लागण झाली. गेल्या सात दिवसांपासून दर दहा हजार नागरिकांमध्ये २०१ जणांना करोनाची लागण होत आहे. यापूर्वी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये दर दहा हजार नागरिकांमध्ये १९७.६ जणांना करोनाची लागण झाली होती. त्यानंतर पहिल्यांदाच रुग्णसंख्या वाढली आहे. गेल्या आठवड्यात शुक्रवारी जर्मनीमध्ये ३७,१२० करोनाचे रुग्ण आढळले होते.

काबूल हल्ला : तालिबान कमांडर हमदुल्लाह मुखलिससह २५ जणांचा मृत्यू
COP26 Summit: बोरिक जॉन्सन यांनी स्वीकारलं पंतप्रधान मोदींचं भारतभेटीचं निमंत्रण

महिनाखेरीपर्यंत लॉकडाउन

ऑकलंडमध्ये सुरू असलेला लॉकडाउन या महिन्याच्या शेवटपर्यंत उठविण्यात येईल, असे सोमवारी सांगण्यात आले. याच भागात करोनाचे काही निर्बंध सोमवारपासून उठविण्यात आले आहेत, असे पंतप्रधान जेसिंडा अर्डेन यांनी सांगितले. डेल्टा प्रकाराचे रुग्ण वाढल्यानंतर गेल्या तीन महिन्यांपासून या भागात लॉकडाउन लावण्यात आला आहे. गेल्या आठवड्यापासून ऑकलंडमध्ये आठवडाभरात करोनाचे ४५०० रुग्ण वाढले आहेत.

शीतगृहाची गरज नाही

करोना प्रतिबंधक लशीच्या साठवणुकीसाठी शीतगृहाची गरज नसल्याचे तंत्रज्ञान शास्त्रज्ञांकडून विकसित करण्यात आले आहे. बोस्टन चिल्ड्रन हॉस्पिटलमधील संशोधकांनी याबाबतची प्रणाली विकसित केली आहे. या तंत्रज्ञानामुळे लशींचे वितरण सोपे होईल आणि विशिष्ट प्रवास मर्यादेचे बंधन नसलेल्या भागात लस पोहोचविता येईल, असे सांगण्यात आले. या संशोधनाचे सविस्तर तपशील लवकरच खुले करण्यात येतील, असेही सांगण्यात आले.

इराक हादरले! पंतप्रधान कादिमींवर ड्रोनद्वारे हल्ला, हत्येच्या प्रयत्नातून बचावले
hafiz saeed : पाकचा बनाव उघड; दहशतवादी हाफिज सईदसह ६ जणांची निर्दोष मुक्तताSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: