हायलाइट्स:
- किरीट सोमय्यांविरोधात काँग्रेसची कोर्टात याचिका
- महाविकास आघाडीवर केलेले टक्केवारीचे आरोप भोवले
- काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दाखल केली याचिका
वाचा: ज्ञानदेव वानखेडेंचा नवाब मलिक यांच्याविरोधात दावा; हायकोर्टानं दिले ‘हे’ निर्देश
अतुल लोंढे यांनी स्वत: आज ही माहिती दिली. राज्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीचे महाविकास आघाडी सरकार आल्यापासून किरीट सोमय्या हे रोजच्या रोज सरकारमधील मंत्र्यांवर आरोप करत आहेत. ठाकरे कुटुंबीयांवरही काही दिवसांपूर्वी त्यांनी आरोप केले होते. साखर कारखान्यांतील घोटाळ्यांच्या विरोधातही ते रोजच्या रोज पत्रकार परिषदा घेत असतात. ‘हे वसुली सरकार असून वसुलीच्या पैशातील ४० टक्के रक्कम शिवसेना, ४० टक्के राष्ट्रवादी काँग्रेस व २० टक्के रक्कम काँग्रेसला मिळते, असा आरोप सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी एका खासगी वृत्तवाहिनीवर बोलताना केला होता. हा आरोप धांदात खोटा असून त्यामुळं काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडीची बदनामी झाली आहे. सोमय्या यांच्या या बेताल, बिनबुडाच्या आरोपांना लगाम घातला जावा म्हणून त्यांच्या विरोधात कोर्टात तक्रार दाखल केली आहे, असं लोंढे यांनी सांगितलं.
नगर जिल्हा रुग्णालय आग: ‘या’ एकाच माणसाकडं बहुतेकांचं बोट
‘सतत खोट्या आरोपांची राळ उडवून महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेत्यांना बदनाम करण्याचं काम सोमय्या करत आहेत. स्वतःच तपास अधिकारी व स्वतःच न्यायाधीश असल्याच्या आविर्भात ते बोलत असतात. त्यामुळंच आम्ही त्यांच्या विरोधात न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे, असं लोंढे यांनी सांगितलं.