नूतन नातेपुते नगरपंचायत येथे महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचारी समन्वय समिती संलग्न नातेपुते कामगार संघटनेची स्थापना

नूतन नातेपुते नगरपंचायत येथे महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचारी समन्वय समिती संलग्न नातेपुते कामगार संघटनेची स्थापना

नातेपुते,08/11/2021/नागेश आदापूरे – आज सोलापूर जिल्ह्यातील नव्‍याने ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतमध्ये झालेल्या नातेपुते नगरपंचायत येथे महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचारी समन्वय समितीचे जनरल सेक्रेटरी अँड सुनिल वाळुजकर यांच्या हस्ते पंढरपूर नगरपरिषद कामगार संघटनेचे अध्यक्ष महादेव अदापुरे यांचे अध्यक्षतेखाली कार्याध्यक्ष नानासाहेब वाघमारे, नातेपुते नगर परिषद कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी प्रदीप वनसाळे, संभाजी अवघडे यांच्या प्रमुख उपस्थितीत नातेपुते कामगार संघटनेच्या फलकाचे उद्घाटन करून कामगार संघटनेची स्थापना करण्यात आली.

     यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी नगरपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायद्याप्रमाणे किमान वेतन मिळावे ,गेले अनेक वर्ष ग्रामपंचायतीमध्ये काम करत असलेल्या कायम कर्मचारी व पाच हंगामी कर्मचारी यांना  कायम करावे व शासकीय नियमाप्रमाणे सर्व लाभ मिळावे अशी मागणी यावेळी केली यावेळी बोलताना महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचारी समन्वय समितीचे जनरल सेक्रेटरी सुनील वाळुजकर यांनी सांगितले की महाराष्ट्रातल्या सर्व ग्रामपंचायतचे रुपांतर झालेल्या नगरपंचायत व नगरपरिषदमधील कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांबाबत शासन स्तरावर सध्या प्रयत्न चालू असून ग्रामपंचायतमधील सर्व कायम कर्मचारी यांचे समावेशन व्हावे तसेच आरोग्य विभागातील सर्व सफाई कर्मचारी यांचेही समावेशन व्हावे यासाठी  शासनाकडे कामगार संघटनाचेवतीने राज्याचे अध्यक्ष डॉ डी एल कराड व पुणे विभागाचे अध्यक्ष प्रा ए बी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा चालू आहे व  आपणास निश्चितपणे न्याय मिळवून देऊ जर कोणीही काम करीत असताना नगरपंचायत कर्मचाऱ्यावर अन्याय केल्यास किंवा त्यांच्या मागण्या मान्य न केल्यास सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या सर्व नगरपालिका कामगार संघटना आपल्यामागे उभ्या करूनआपल्या वरील अन्याय दूर करू असे  सांगितले यावेळी कामगार नेते नानासाहेब वाघमारे, महादेव अदापुरे,माळशिरस नगरपंचायत कामगार संघटना चे अध्यक्ष सुनील मदने यांनी मनोगत व्यक्त केले.

     हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नातेपुते कामगार संघटनेचे अध्यक्ष भानुदास काळे, जनरल सेक्रेटरी प्रदीप वनसाळे, संभाजी अवघडे यांनी विशेष प्रयत्न केले. या कार्यक्रमास कामगार नेते सुनील मदने, संतोष सर्वगोड, दिनेश साठे,अनिल अभंगराव, प्रीतम येळे, धनजी वाघमारे व स्थानिक कर्मचारी संघटना पदाधिकारी राजू चांगण, शहाजी काळे,संदीप काळे,भीमा लांडगे, जय क्षीरसागर  आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: