स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बिलासाठी इंद्रेश्वर साखर कारखाना पाडला बंद

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बिलासाठी इंद्रेश्वर साखर कारखाना पाडला बंद
उपळाई ,08/11/2021- सोलापूर जिल्ह्यातील इंद्रेश्वर साखर कारखाना उपळाई,तालुका बार्शी या कारखान्यांने शेतकऱ्यांची मागील वर्षाची बिले (FRP) दिलेली नसल्यामुळे साखर आयुक्तांनी सदर कारखान्याला गाळप परवाना दिलेला नाही तरीही यावर्षीचे बेकायदेशीर गाळप सुरू केले होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक होऊन आज रोजी सदर कारखान्यावर जाऊन बेकायदेशीर सुरू असलेले गाळप बंद पाडले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष आदिनाथ परबत यांच्यासह कार्यकर्त्यांनी कारखान्याच्या गव्हाणीमध्ये बसून त्या ठिकाणी आंदोलन सुरू केले आहे.जोपर्यंत शेतकऱ्यांची मागील थकबाकी देणार नाही तोपर्यंत कारखान्यास गाळप हंगाम सुरु करू देणार नाही अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतली आहे. कालच सोलापूर जिल्ह्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी बेकायदेशीर सुरू असलेल्या कारखान्यांचे गाळप बंद पडणार असा इशारा दिला होता.

 आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेने इंद्रेश्वर कारखाना बंद पाडून जिल्ह्यांमध्ये या थकित एफआरपीसाठी तीव्र आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे युवा जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: