लक्ष्मण गुलाबराव रक्षक या भाविकांकडून श्रीस सोन्याच्या बांगड्या अर्पण

लक्ष्मण गुलाबराव रक्षक या भाविकांकडून श्रीस सोन्याच्या बांगड्या अर्पण

पंढरपूर, 08/11/2021 – नागपूर येथील लक्ष्मण गुलाबराव रक्षक या भाविकांकडून श्रीस सोन्याच्या बांगड्या अर्पण करण्यात आल्या आहेत. लक्ष्मण गुलाबराव रक्षक,नागपूर यांनी ५३.५ग्रॅम वजनाच्या अंदाजे रु.२.५०/ लक्ष इतक्या किंमतीच्या बांगड्या श्री विठ्ठल रुक्मिणी मातेस आज सोमवार,दि ०८ नोव्हेंबर ,२०२१ रोजी अर्पण केल्या .

लक्ष्मण रक्षक यांच्या मातोश्री मिराबाई गुलाबराव रक्षक यांचे नुकतेच निधन झाले आहे .ही सोन्याची वस्तू श्री.रक्षक यांच्या मातोश्रींची होती . सदरची वस्तू श्री विठ्ठल रूक्मिणी मातेस माझ्या पश्चात अर्पण करावी अशी त्यांची इच्छा होती. त्यानुसार श्री.रक्षक यांनी सदर सोन्याची वस्तू आज श्रीस अर्पण केली आहे . यावेळी श्री.रक्षक यांचा यथोचित सन्मान श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्यावतीने सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते करण्यात आला .

यावेळी सदस्य श्रीमती शकुंतला नडगिरे,ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख (जळगांवकर),अँड.माधवी निगडे , ह.भ.प. प्रकाश जवंजाळ , अतुलशास्त्री भगरे गुरूजी, ह.भ.प. शिवाजीराव मोरे , नगराध्यक्षा सौ. साधना भोसले तसेच कार्यकारी अधिकारी तथा प्रांताधिकारी गजानन गुरव , व्यवस्थापक बालाजी पुदलवाड आणि मंदिर कर्मचारी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: