हायलाइट्स:
- अहमदनगर जिल्हा रुग्णालय आगीप्रकरणी राज्य सरकारने उचलले कारवाईचे मोठे पाऊल.
- जिल्हा शल्य चिकित्सकासह दोन वैद्यकीय अधिकारी आणि एक स्टाफ नर्स नलंबित.
- या प्रकरणी इतर दोन स्टाफ नर्सची सेवा केली समाप्त.
अहमदनगर जिल्हा रुग्णालयात घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेच्या प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात येत असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करत घोषित केले आहे.
क्लिक करा आणि वाचा- कोर्टाचा अवमान करून संप चिघळवणार असतील तर…; मंत्री अनिल परब यांचा ‘हा’ इशारा
निलंबनाची कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश ढाकणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाखा शिंदे आणि स्टाफ नर्स सपना पठारे यांचा समावेश आहे. तर स्टाफ नर्स आस्मा शेख आणि स्टाफ नर्स चन्ना आनंत यांची सेवा समाप्त करण्यात आल्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनी म्हटले आहे.
क्लिक करा आणि वाचा- दोन संशयितांनी अंबानींच्या ‘अँटिलिया’चा पत्ता विचारला; उडाली खळबळ, परिसरात नाकाबंदी
अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात लागलेल्या भीषण आगीत ११ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेने संपूर्ण देशभर हळहळ व्यक्त करण्यात आली. या दुर्घटनेवरून विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवत ताशेर ओढले होते. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचा अहवाल आठ दिवसांत सादर करण्याचे आदेश दिले होते.
क्लिक करा आणि वाचा- जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत भाजपाचे धक्कातंत्र; उमेदवारांनी घेतला ‘हा’ निर्णय
दरम्यान, या दुर्घटनेती मृतांच्या कुटुंबीयांना राज्य शासनाकडून ५ लाख रुपये व राज्य आपत्ती निधीमधून २ लाख रुपये अशी ७ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.